ओएलएक्‍सवरून मोपेड खरेदी करणे पडले महागात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नाशिक : जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या ओएलएक्‍स या संकेतस्थळावरून जुनी मोपेड दुचाकी खरेदी करणाऱ्यास दोघांनी 28 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. जयकिशन, मानसिंग असे दोघा संशयितांची नावे आहेत. भूषण प्रभाकर पाटणे (रा. वास्तू पार्क, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना जुनी मात्र चांगल्या स्थितीतील मोपेड दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी ओएलएक्‍स या संकेतस्थळावर शोध घेतला. त्यावेळी संशयित जयकिशन याने ऍक्‍टिव्हा 5 जी ही मोपेड दुचाकी (एमएच 15 जीएस 1125) विक्रीसाठीची जाहिरात केली होती. भूषण पाटणे यांनी संशयित जयकिशन याच्याशी संपर्क साधून व्यवहार केला.

नाशिक : जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या ओएलएक्‍स या संकेतस्थळावरून जुनी मोपेड दुचाकी खरेदी करणाऱ्यास दोघांनी 28 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. जयकिशन, मानसिंग असे दोघा संशयितांची नावे आहेत. भूषण प्रभाकर पाटणे (रा. वास्तू पार्क, जयभवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना जुनी मात्र चांगल्या स्थितीतील मोपेड दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी ओएलएक्‍स या संकेतस्थळावर शोध घेतला. त्यावेळी संशयित जयकिशन याने ऍक्‍टिव्हा 5 जी ही मोपेड दुचाकी (एमएच 15 जीएस 1125) विक्रीसाठीची जाहिरात केली होती. भूषण पाटणे यांनी संशयित जयकिशन याच्याशी संपर्क साधून व्यवहार केला. त्यानंतर त्या व्यवहारापोटी भूषण यांनी संशयिताला वेळोवेळी पेटीएम द्वारे 28 हजार रुपये दिले. त्यानंतरही संशयितांनी गाडी सोडण्यासाठी 11 हजार रुपयांची मागणी केली. 11 हजार रुपये दिले नाही, तर ऍक्‍टिवाही मिळणार नाही. कोणाकडे तक्रार करायची करा असे म्हणून संशयित जयकिशन व मानसिंग यांनी फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार विंचू हे अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/OLXonline/crimenews