पोलिसांनी भागविली भाविक महिलांची तहान 

live photo
live photo

नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीचा यात्रोत्सव सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून शहर-परिसरातील भाविक महिलांची गर्दी होते आहे. त्यातच ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्याने रांगेत उभ्या असलेल्या भाविक महिलांची तहान मुंबई नाका पोलिसांनी भागविली. दर्शनासाठी रांगेत ताटकळत भर उन्हात थांबलेल्या भाविक महिलांसाठी ट्रस्टकडून पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी पाण्याच्या बाटल्या मागवित या भाविक महिलांची तहान भागविली. 

नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते. तर, सायंकाळीही चार वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते. मात्र सध्या ऑक्‍टोबर हिटचा उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सकाळी पायी दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांची लांबच्या लांब रांग असते. 
या भाविकांसाठी मंदिर ट्रस्टकडून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे भर उन्हात महिला भाविकांना तहानेवाचून ताटकळत थांबावे लागते. सदरची बाब मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्‍स मागविले आणि भर उन्हामध्ये दर्शनरांगेत थांबलेल्या महिला भाविकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करीत त्यांची तहान भागविली. पोलिसांच्या या कृत्याचा महिला भाविकांकडून कौतूक होते आहे. 

पायी येणाऱ्या अल्पवयीन मुलांना मनाई 
गेल्या वर्षी भारतनगर परिसरातून भल्या पहाटे देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या 16 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्युची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शहराच्या उपनगरीय परिसरातून ÷अल्पवयीन मुले पालकांविना देवीच्या दर्शनासाठी पायी येत असतील तर संबंधित पोलीस ठाण्याच्या बिटमार्शलकडून त्यांना रोखले जाऊन परत घरी पाठविण्यात येते आहे. पोलिसांच्या या सतर्कमुळे दूर्घटना टळणार आहे. 

यात्रोत्सवात येणाऱ्या महिलांनी दागिने परिधान करू नयेत. लहान मुलांचेही दागिने काढून घ्यावेत. मौल्यवान वस्तू खिशात ठेवू नये. दर्शनासाठी पालकांविना ÷अल्पवयीन मुलांनी येऊ नये. अशा सूचना वारंवार केल्या जात आहेत. गर्दीमध्ये चोरीची शक्‍यता अधिक असते. तरी भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे. 
- विजय डमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com