पोलीस आयुक्तांनी केली विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी 

live photo
live photo

नाशिक : शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली होती. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली असता, याच मार्गावरील स्मार्ट रोडचा येणाऱ्या अडथळ्याबाबत स्मार्टसिटी प्रकल्पाधिकाऱ्यांना सूचना केल्या. सदरच्या सूचनानुसार, गणेशोत्सवापूर्वीच मार्गातील त्रुटी दूर करून सदरचा मार्ग दुतर्फा वाहतुकीला खुला करण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांना दिली. 

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी आज (ता.23) दुपारी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. 
आगामी सणउत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये होत आहेत. यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याची मागणी केली होती. यात, अशोकस्तंभ परिसरात मंडळाचे गणपती असतात. याठिकाणी मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. तर विसर्जन मिरवणूक ही पारंपरिक मार्ग असलेल्या महात्मा गांधी रोडनंतर मेहर सिग्नल, अशोकस्तंभ ते रविवार कारंजा व पुढे पंचवटीत गोदावरी नदीपात्रात विसर्जित होत असते. यंदाही मात्र याच मार्गावरील मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ यादरम्यान, स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अद्यापही ते पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीला अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे उंचवटे आहेत. त्यामुळे 15 ते 30 फुट उंचीच्या गणेश मूर्तींचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्मार्ट रोडचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी गणेश मंडळांनी केली होती. 
त्याची दखल घेत, पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज महापालिकेचे अधिकारी, स्मार्टसिटीच अधिकारी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यां समवेत स्मार्ट रोडची संयुक्त पाहणी केली होती. यासंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्मार्ट रोडची पाहणी करीत, त्यासंदर्भात स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल यांना सूचना केल्या. प्रकाश थविल यांनीही येत्या आठवडाभरात करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती देत, गणेशोत्सवापूर्वीच सदरचा रोड दुतर्फा वाहतुकीला सज्ज असेल अशी ग्वाही दिली. त्यानुसार त्यांनी ठेकेदारासही आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com