live photo
live photo

एचबीएन गुंतवणूकदारांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना धरले धारेवर 

नाशिक : नाशिकसह देशभरातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या एचबीएन कंपनीविरोधात एनसीएलटीमध्ये (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) दावा सुरू आहे. यातून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना लवकरच रक्कम परत मिळण्याची आशा, गुंतवणूकदारांनी एकत्रित स्थापित केलेल्या ऑन एचबीएन इन्व्हेस्टर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आज (ता.18) पत्रकार परिषदेमध्ये केला. परंतु, यावेळी नाशिकमधील गुंतवणूकदारांनी आलेल्या ट्रस्ट पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. त्यामुळे तणावाचा वातावरण निर्माण होऊन गोंधळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती. 

शालिमार येथील हॉटेल हॉलिडे प्लाझा याठिकाणी ऑल एचबीएन इन्व्हेस्टर ट्रस्टतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष गणेश नरेडी, संतोष निर्मलकांत, एन.डी. साहू, राजू दोडके, ऍड. सोनम ओतेकर, श्रीराम चित्ते उपस्थित होते. दूग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या एचबीएन कंपनीने देशभरात जाळे विणले आणि 300 ते 1 हजार रुपयांची गुंतवणुकीची योजना आणून त्यावर परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करून घेतली. परंतु 2014 पासून कंपनीला टाळे लागले असून देशभरातील 19 लाख 76 हजार गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यात नाशिकच्या गुंतवणूकदारांचा आकडाही मोठा आहे. उत्तर भारतातील काही गुंतवणूकदारांनी एकत्रित येत ऑल एचबीएन इन्व्हेस्टर ट्रस्टची स्थापना करून त्यामाध्यमातून न्यायालयात दावा दाखल करून लढा उभा केला आहे. त्याचसंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी आज नाशिकच्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शनासाठी आले होते. कंपन्यांमार्फत फसवणूक झालेल्यांसाठी केंद्राने एनसीएलटी न्यायालय सुरू केले असून ते परळ (मुंबई) येथे आहे. यासंदर्भातील माहिती ऍड. सोनम ओत्तेकर यांनी दिली. मात्र यावेळी शहरातील जमलेल्या गुंतवणूकदारांनी प्रश्‍नांची भडीमार करीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. याच कंपनीचे एजंट असलेले श्रीराम चित्ते यांनीही गुंतवणूकदारांनी दिशाभूल केल्याचा आरोप करीत धारेवर धरले. 

गुंतवणूकदारांच्या आरोपांच्या फैरी 
आधीच आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दावा दाखल करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या डीडी आवश्‍यक असल्याचे सांगितले. तसेच, श्रीराम चित्ते या कंपनीच्या पूर्वाश्रमीच्या एजंटने, सदरच्या सत्रात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 500 रुपयांची मागणी केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आल्याचे सांगत वेळ मारून नेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com