लाचखोर सहाय्यक अभियंत्याला अटक 

Residential photo
Residential photo

पीडब्ल्युडी कार्यालयात 2 लाख 11 हजार रुपयांची स्वीकारली लाच 

नाशिक : एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे भ्रष्टाचार निर्मूलनासाठीचा दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असताना, आज सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तब्बल 2 लाख 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाला रंगहाथ अटक करण्यात आली आहे. भारत सुदाम चव्हाण असे सहाय्यक अभियंत्याचे नाव असून त्याच्याविरोधात रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांची इमारत आहे. सदरची इमारत त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्ग मुलींच्या वस्तीगृहासाठी भाडेतत्त्वावर शासनाला द्यायची होती. त्यासाठीचा प्रस्तावही सादर केला होता. त्याकरीता त्या इमारतीचे मूल्यांकन करून भाडे प्रस्तावित करून प्रमाणपत्राची आवश्‍यकता होती. त्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक स्थापत्य अभियंता भारत चव्हाण याच्याकडे संपर्क साधला होता. त्यावेळी लाचखोर चव्हाण याने तक्रारदाराकडे 1 महिन्याच्या वसतीगृहाच्या भाडेप्रमाणे 7 लाख 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, आज (ता.1) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळापूर्व पडताळणी केली असता, त्यावेळी लाचखोर चव्हाण याने तडजोडीअंती 2 लाख 11 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, त्याने सदरची लाचेची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक कार्यालयातील त्याच्या कक्षामध्ये सायंकाळी स्वीकारली असता, दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com