नाशिकरोड न्यायालयाबाहेर वकीलास विरुद्‌ध पक्षकाराकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नाशिक : नाशिकरोड न्यायालयाबाहेर एका पक्षकाराला दोघांनी मारहाण केली असता, वाद सोडविण्यासाठी गेलेल्या वकीलास दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सदरचा प्रकार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असून, रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, या प्रकारात पक्षकाराच्या डोक्‍याला गावठी कट्टा लावल्याचीही चर्चा आहे. 

नाशिकरोड येथील कौठुंबिक न्यायालयात मयुर अशोक कोकाटे (रा. पुणतांबा) यांचा पोटगीचा खटला सुरू आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने निश्‍चित केलेली पोटगीची 25 हजार रुपये मयुर कोकाटे यांनी त्याच्या पत्नीस रोख स्वरुपात देत अर्जावर स्वाक्षरी घेतली होती. मात्र, विरोधी पक्षाचे ऍड. उमेश साठे व ऍड. विकास घुर्गे यांनी अर्जावर खाडाखोड करीत 25 हजार रुपयांऐवजी 5 हजार केली. सदरची बाब मयुर कोकाटे यांचे वकील ऍड. अल्पेश लुंकड यांनी आज (ता.7) न्यायालयाच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे न्यायालयाने याबाबत नोंद घेत तक्रार अर्ज देण्याचे सांगितले होते. त्यामुळे, या बाबीचा राग अनावर झाल्याने न्यायालयाबाहेर नाशिक-पुणे मार्गावर मयुर कोकाटे व त्यांचे सासरे प्रकाश रामचंद्र जोर्वेकर (रा. डीजीपीनगर, उपनगर) यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी संशयित योगेश संदीप सोनवणे याने मयुर कोकाटे यांच्या डोक्‍याला गावठी कट्टा लावला आणि डोक्‍यात हेल्मेट मारून जखमी केले. सदरचा प्रकार सोडविण्यासाठी धावलेले ऍड. अल्पेश लुंकड त्यांनाही प्रकाश जोर्वेकर यांनी मारहाण केल्याचा आरोप ऍड. लुंकड यांनी को आहे. दरम्यान, याप्रकरणी ऍड. लुंकड व मयुर कोकाटे यांनी नाशिकरोड पोलिसात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये सदरचा र्प्रकार कैद झाला असून ते तपासून रितसर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऍड. लुंकड यांनी केली आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikroad-adovcate-crimenews