तीन घरफोड्यातून दीड लाखांचा ऐवजा चोरीला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक : शहर-परिसराच्या हद्दीमध्ये तीन बंद घरांचे कुलूप-कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागदागिन्यांसह सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी इंदिरानगर, मुंबई नाका, सातपूर पोलिसात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
... 

नाशिक : शहर-परिसराच्या हद्दीमध्ये तीन बंद घरांचे कुलूप-कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागदागिन्यांसह सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी इंदिरानगर, मुंबई नाका, सातपूर पोलिसात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
... 
कल्पेश अधिकराव पाटील (रा. वास्तू रो-हाऊस, आनंदनगर, विक्रीकरभवनजवळ, पाथर्डीफाटा) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे रोहाऊस गेल्या 10 ऑगस्ट ते कालपर्यंत (ता.5) बंद होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी रोकड व दागदागिने असा 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात 15 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 9 हजार रुपयांचे सोन्याचे टॉप्स, 3 हजार रुपयांचे सोन्याचे मणी, 10 हजार रुपयांची रोकड असा 37 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप हे तपास करीत आहेत. 
तर, वाजिद मकसुद खान (रा. सिदार हाईटस्‌, सुमानचंद्र बिल्डिंगजवळ, अशोका मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.5) सकाळी 9 वाजेच्या सुमारसा त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातून 65 हजार रुपयांची रोकड चोरून नेला. यात मुंबई नाका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संजय भिसे हे अधिक तपास करीत आहेत. तिसरी घरफोडी सातपूरच्या एमएचबी कॉलनीत घडली. प्रवीण मोहन सोन्स (रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी (ता.4) त्यांच्या आईला फ्रान्सला जायचे होते. त्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर सोडण्यास कुटूंबियांसह ते गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी 62 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात 20 हजार रुपयांची सोन्याची चैन, 12 हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, 10 हजार रुपयांची अंगठी, 10 हजार रुपयांचा सोन्याचा वेडा, 10 हजार रुपयांचा सोन्याचे टॉप्स असा ऐवज आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रघु नरोटे हे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikrobberycrimenews