पेन्शनसाठी जन्मदात्यांना मारहाण करून घराबाहेर हाकलले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नाशिक : 88 वर्षीय जन्मदात्या बापाला त्यांच्याच घरात जाऊन मुलाने मारहाण करतानाच, पेन्शन नावावर करून द्या. इतकी वर्षे जगून काय उपयोग असे म्हणून वयस्क आईबापाला मारहाण करीत घरातून हाकलून लावले. एवढेच नव्हे दोन दिवसांनी पत्नीच्या औषधांची फाईल घेण्यासाठी आलेल्या आजोबाला नातवाने शिवीगाळ करीत, रस्त्यावर गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देत हाकलून लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात मुलगा, सून आणि नातवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : 88 वर्षीय जन्मदात्या बापाला त्यांच्याच घरात जाऊन मुलाने मारहाण करतानाच, पेन्शन नावावर करून द्या. इतकी वर्षे जगून काय उपयोग असे म्हणून वयस्क आईबापाला मारहाण करीत घरातून हाकलून लावले. एवढेच नव्हे दोन दिवसांनी पत्नीच्या औषधांची फाईल घेण्यासाठी आलेल्या आजोबाला नातवाने शिवीगाळ करीत, रस्त्यावर गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देत हाकलून लावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलिसात मुलगा, सून आणि नातवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्याच आठवड्यात वृद्धाश्रमात दाखल आजोबा आपल्या घराच्या-कुटूंबियांच्या ओढीने अंधेरीला गेले, परंतु त्याच मुलाने त्यांना घरी न नेता, परत वृद्धाश्रमात आणून सोडल्याचा प्रकार घडला होता. अशा घटनांमुळे ज्या जन्मदात्यांमुळे जगण्याचा आनंद घेणारे त्यांचीच मुले मात्र त्यांना पोरके करून सोडत आहेत. 

सुधाकर रामभाऊ जमदाडे (88, रा. दत्त मंदिरसमोर, शिवाजीनगर, नाशिक-पुणा रोड, नाशिकरोड) असे अभागी जन्मदात्याचे नाव आहे. ते सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून पत्नीसह ते राहतात. गेल्या 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा नरेंद्र, सून उज्ज्वला व नातू अक्षय असे तिच्या त्यांच्या घरात बळजबरीने घुसले. त्यावेळी संशयित नरेंद्र याने, "तुमची पेन्शन माझ्या नावावर करून द्या, एवढे वय झाले आता कशाला जगता असे बोलून मारहाण सुरू केली. त्यावेळी सून व नातवानेही जमदाडे दाम्पत्यालाही मारहाण करीत, दोघांना घरातून हाकलून देत त्यांचे घरच बळकावून घेतले. 
त्यानंतर दोन दिवसांनी 12 ऑगस्ट रोजी सुधाकर जमदाडे यांच्या पत्नीची तब्बेत बिघडली. मात्र त्यांच्यावर सुरू असलेली औषधोपचाराची फाईल त्याच घरी होती. त्यामुळे ते व त्यांचा लहान मुलगा, सून असे तिने ती फाईल घेण्यासाठी गेले. त्यावेळी घरात संशयित नरेंद्रचा मुलगा अक्षय याने त्यांना शिवीगाळ करीत, हाकलून लावले. तसेच, तू पेन्शन घ्यायला गेला की तुला रस्त्याने गाडीवरच उडवतो. एकदाचा मेला की बरे होईल अशीही धमकी दिली. तसेच, त्यांच्या पत्नीेचे औषधोपचाराचे कागदपत्र, जमदाडे यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासबुक गहाळ केले. अखेरित त्यांनी उपनगर पोलिस ठाणे गाठून संशयित मुलगा, सून व नातवाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikseniorcitizencrimenews