सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

नाशिक : होमपाडा (ता.पेठ) येथे सर्पदंशाने आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यु झाला. वैशाली संदीप चौधरी (8, होमपाडा, नाचलोंढी, ता.पेठ) असे चिमुरडीचे नाव आहे. वैशाली ही राहत्या घरात कुटूंबियांसमवेत गुरुवारी (ता.31) झोपलेली होती. पहाटेच्या सुमारास ती साखर झोपेत असताना अचानक तिच्या डाव्या कानास विषारी सर्पाने दंश केला. सदरची घटना लक्षात येताच वडील संदीप चौधरी यांनी तिच्यावर हरसूल शासकीय रूग्णालयात प्रथमोपचार करून आज (ता.1) सकाळी अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी हरसुलप पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/snakebite/girldeath/news

टॅग्स