सविता बागुलचा मृत्यु नैसर्गिक; व्हिसेरा ठेवला राखून 

सविता बागुलचा मृत्यु नैसर्गिक; व्हिसेरा ठेवला राखून 

नाशिक : भगूर येथे रो-हाऊसमध्ये राहणाऱ्या दोघी बहिणीपैकी एकीचा अकरा दिवसांपूर्वीच मृत्यु झाला. मात्र त्याची कोणतीही माहिती बाहेर पडू न देता दुसरी बहीण ही त्या मृतदेहाजवळ बसून राहिली. दूर्गंधी सुटल्यानंतर सदरची बाब उघडकीस आली. दरम्यान, मृतदेह कुजलेला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी सविता बागुल हिचा मृत्यु नैसर्गिक झाला आहे. मात्र तरीही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

भगूर गावात विजयनगरमध्ये पंचगंगा सोसायटीतील रो हाऊसमध्ये सविता आणि मिना दिगंबर बागुल या दोन बहिणी राहतात. दोघींही मनोरुग्ण असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.31) दुर्गंधी सुटल्याने पोलिसांना खबर देण्यात आली. देवळाली कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बागुल यांच्या घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी दूर्गंधीचा भपकाराच बाहेर आला. घरात सविता दिगंबर बागुल (42) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह होता तर त्याजवळ बहीण मिना बागुल (44) या बसून होत्या. सविता यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेणेही अशक्‍य असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाचे डॉ. हेमंत घंगाळ यांनी जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानुसार, त्यांचा मृत्यु नैसर्गिक आहे. मात्र तरीही व्हिसेरा राखून ठेवण्यात आल असून तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. बागुल भगिनी या आईच्या मृत्युनंतर राहत होत्या. तर त्यांचा भाऊ देवळाली परिसरात राहतो. काही महिन्यांपासून या दोन्ही बहिनीं बाहेर पडल्या नसल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

दुसरीला भावाने नेले 
दोघी भगिनी या मनोरुग्ण असल्याची चर्चा आहे. सदरच्या घटनेनंतर मीना बागुल यांना त्यांचा देवळालीत राहणाऱ्या भावाने नेले असल्याचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. मात्र सदरच्या घटनेमुळे उपनगर परिसरात काही वर्षांपूर्वी घडलेल्या मल्लपुरे घटनेला उजाळा मिळाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com