विवाहितेची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नाशिक : अंबड परिसरातील मुरारीनगर येथील 26 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्त्या केली. सोनी अविनाश अहिरे (26, स्वामी सोसायटी, वृंदावननगर, मुरारीनगर, अंबड) असे विवाहितेचे नाव आहे. सोनी अहिरे यांनी गेल्या शनिवारी (ता.14) सायंकाळी सात वाजेपूर्वी कधीतरी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विवाहिता सोनी अहिरे यांनी दोन महिन्यांपूर्वीही विषारी औषध सेवन करीत आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. मात्र पतीने तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषधोपचारामुळे विवाहितेचे प्राण वाचले होते. परंतु शनिवारी पुन्हा गळफास घेत आत्महत्त्या केली.

नाशिक : अंबड परिसरातील मुरारीनगर येथील 26 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्त्या केली. सोनी अविनाश अहिरे (26, स्वामी सोसायटी, वृंदावननगर, मुरारीनगर, अंबड) असे विवाहितेचे नाव आहे. सोनी अहिरे यांनी गेल्या शनिवारी (ता.14) सायंकाळी सात वाजेपूर्वी कधीतरी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्त्या केली. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विवाहिता सोनी अहिरे यांनी दोन महिन्यांपूर्वीही विषारी औषध सेवन करीत आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. मात्र पतीने तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषधोपचारामुळे विवाहितेचे प्राण वाचले होते. परंतु शनिवारी पुन्हा गळफास घेत आत्महत्त्या केली. तसेच विवाहितेजवळ तिने लिहिलेली चिठ्ठी मिळून आली आहे. यात विवाहितेने आपल्या मृत्युस कोणीही कारणीभूत नसल्याचे म्हटले आहे. विवाहितेचे माहेर पंचवटीतील संजय नगर येथील होते. याप्रकरणी माहेरच्यांनी पोलीस ठाण्यात येऊन विवाहितेच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता, पोलिसांनी विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठीची माहिती दिल्यानंतर माहेरच्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikwomensusidecrimenews