दुचाकीच्या धडकेत चिमुकला ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नाशिक : पिंपळगाव बहुला येथे भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत तीन वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची घटना घडली. इश्‍वर अंबादास दिघे (3) असे नाव आहे. रघुनाथ रमेश कोमनर (रा. पिंपळगाव बहुला) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.16) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीवरून (एमएच 15 डीटी पुढचा नंबर नाही) भरधाव वेगात आला. पिंपळगाव बहुला येथील दत्त मंदिरासमोर त्याने रस्त्यालगत खेळणाऱ्या इश्‍वर या चिमुकल्यास जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी इश्‍वर यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashipoliceaccident