मधुमेह रुग्णाची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावरील एसएमबीटी रुग्णालयात मधुमेहामुळे त्रस्त असलेल्या 45 वर्षीय रुग्णाने चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलीसात नोंद करण्यात आली आहे. 

तुकाराम वालकू थोरात (45, रा. मुंबई) असे रूग्णाचे नाव आहे. तुकाराम थोरात यांना मधुमेहाचा आजार होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी घोटी-सिन्नर मार्गावरील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. आज (ता.19) दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्त्या केली. वाहनतळाजवळील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात सदरची बाब आली. जखमी अवस्थेतील थोरात यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. परंतु, अतिरक्तश्रावाने त्यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच वाडिवऱ्हे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. दरम्यान तुकाराम थोरात यांनी मधुमेहाच्या आजारास कंटाळूनच आत्महत्त्या केल्याचे सांगितले जाते आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashipoliceaccident