गिरीष महाजनांनी टोचले आमदारांचे कान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नाशिक, ता. 7- महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहरातील तिनही आमदारांनी महापालिकेच्या कामकाजातचं अधिक लक्ष घातल्याची जाणीव शहराचे पालकत्व सांभाळणाऱ्या गिरीष महाजन यांना महिनाभरावर निवडणूक आली असताना झाली असून त्यांनी विधानसभा मतदारसंघात आमदारांनी लक्ष घालण्याच्या सल्ला देत कान टोचले. आमदारांचे महापालिकेतचं अधिक लक्ष असल्याने त्यातून वाद निर्माण होत असल्याची स्पष्टोक्ती देत आगामी निवडणुकीत सर्वाधिक मते घेणाऱ्यालाचं उमेदवारी देणार असल्याचे सांगतं आमदारांना धोक्‍याचा ईशारा दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप दहा ऑक्‍टोंबरला होत असून तपोवनात जाहिर सभा होणार आहे. सभेच्या जागेची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री महाजन यांनी भेट दिली असता त्यावेळी बोलतं होते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहरातील विद्यमान तिनही आमदारांनी महापालिकेच्या कामकाजातचं अधिक लक्ष घातल्याने अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आयुक्तांच्या बदल्या, ठराव घुसविणे, समर्थक नगरसेवकांना प्रमुख पदे मिळण्यासाठी लॉबिंग करणे यावरून शहरात भाजपची नाचक्की झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दोन दिवसांपुर्वी महासभेच्या ठरावात परस्पर बदल करण्यावरून आमदार बाळासाहेब सानप, माजी गटनेते संभाजी मोरुस्कर व महापौर रंजना भानसी चर्चेत आले होते. भाजपच्याचं चार नगरसेवकांनी आयुक्तांची भेट लाय डिटेक्‍टर चाचणी करण्याची मागणी केल्याने आमदारांचा महापालिकेतील हस्तक्षेप अधिक चर्चेत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. महाजन यांनी आमदारांचे कान टोचले. महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालण्याऐवजी मतदारसंघात लक्ष घालण्याचा सल्ला त्यांनी दिला. आमदारांच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत असल्याची कबुली दिली. आमदारांनी पुर्णवेळ महापालिककडे लक्ष घालून उगाचचं अडचणी निर्माण न करण्याचा सल्ला त्यांनी देत आमदारांचे कान टोचले, मात्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पालकमंत्र्यांनी उशिराने सल्ला दिल्याचे चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. 
निवडुन येणाऱ्यांनाचं उमेदवारी 
आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला तर उमेदवारी मिळेलचं परंतू त्यातही सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराचाचं विचार होणार असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. सर्वाधिक मते कोणाला मिळणार हे निवडणुक निकालानंतरचं स्पष्ट होणार आहे परंतू शहरातील तिनही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळेलचं या शाश्‍वती नसल्याचे पालकमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews Girish Mahajan