फेरीवाला धोरणा विरोधात निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिक, ता. 28- फेरीवाला धोरणांतर्गत शहरात रेखांकन करण्यात आले असून त्यातून हॉकर्सवर अन्याय झाला आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची फेरआखणी करावी या मागणी साठी आज महापालिका मुख्यालयासमोर जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने निर्दशने करण्यात आली. 

महापालिकेने फेरीवाला धोरणाची आखणी केली त्यावेळी उपायुक्त पदाचा कार्यभार रोहिदास बहिरम यांच्याकडे होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली त्यात फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत अनियमितता झाल्याचे सिध्द झाले आहे. फेरीवाला संघटनेने देखील चुकीच्या पध्दतीने फेरीवाला धोरणाची अंमलजावणी होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. फेरीवाला समितीच्या मंजुरीशिवाय राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करू नये, आकारली जाणारी फि रद्द करावी, फेरीवाल्यांविरोधात अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवू नये, फेरीवाल्यांची बायोमेट्रीक नोंदणी रद्द करावी, फेरीवाल्यांच्या नावांची छाननी करावी आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे कार्याध्यक्ष जावेद शेख, नवनाथ लव्हाटे, चंद्रकला पारवे, जया पाटील, शकुंतला शिंदे, संजय बर्वे, सुनिल संधानशिव, मुश्‍ताक शेख, रामभाऊ चव्हाण आदी निर्दशानात सहभागी झाले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews Hawkers Andolan