निर्भया पथकाने टवाळखाेरांच्या आवळल्या मुसक्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

इंदिरानगर : रक्षाबंधना च्या सणासाठी भावाचे आौक्षण करणे अर्ध्यात सोडून निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या टीमने वडाळा येथील घरकुलातील महीलांना त्रास देणार्या संशयीताच्या मुसक्या आवळत या महीलांना रक्षाबंधनाची अनोखी भेट दीली.

इंदिरानगर : रक्षाबंधना च्या सणासाठी भावाचे आौक्षण करणे अर्ध्यात सोडून निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक छाया देवरे आणि त्यांच्या टीमने वडाळा येथील घरकुलातील महीलांना त्रास देणार्या संशयीताच्या मुसक्या आवळत या महीलांना रक्षाबंधनाची अनोखी भेट दीली.

वडाळा येथील शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या घरकुलात राहणार्या महीलांची किरण मल्हार हा अनेक दीवसांपासून छेडछाड करत होता.त्याच्या दशहतीमुळे तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते.काल सर्वत्र स्वातंत्रदिन आणि रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना मल्हार चे उद्योग सुरू झाले.हीम्मत करून एका महीलेने उपनिरीक्षक देवरे यांना याबाबत मोबाईल द्वारे माहीती दीली.त्यावेळी त्या त्यांच्या भावाचे आौक्षण करत होत्या.घटनेचे गांभिर्य ओळखत त्यांनी भावाचे आौक्षण बाजूला ठेवत त्यांनी त्यांचे सहकारी उपनिरीक्षक श्वेता बेलेकर पोह. गांगुर्डे ,विकास पाटील ,जाधव यांच्या सह वडाळा गाठले.पोलीस पथकाला बघून मल्हार ची बोबडी च वळली.त्याच्या जागेवर मुसक्या आवळून पोलीसी हीसका देखील दाखवला.अनेक दीवसांपासून सुरू असलेल्या जाचातून सुटका झाल्याने आज रक्षाबंधना ची जणू भेट दील्याची भावना येथील महीलांनी व्यक्त केली आहे.
सणवार ठीक आहे.पण कर्तव्य महत्वाचे आहे.महिला आणि युवतींना पुन्हा आवाहन करावेसे वाटते की,निर्भया पथक त्यांच्या सुरक्षीततेसाठी आहे.त्यामुळे कोणताही वैयक्तीक अथवा सामाजीक त्रास असला तरी तातडीने त्यांनी कळवले पाहीजे.त्यांना न्याय दीला जाईल.वेळप्रसंगी त्यांच्या आवश्‍यकतेनुसार त्यांची आोळख देखील गुप्त ठेवण्यात येईल.महीलांना त्रास सहन न करता तातडीने निर्भया पथकाच्या 9403165506 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कळवले तर लगेचच त्यांना मदत मिळेल याची खात्री देते

छाया देवरे (उपनिरीक्षक)-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SakalNews Nirbhay