महापालिकेच्या शाळां दहावी पर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक, ता. 6- महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारताना खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत विद्यार्थी मागे राहू नये म्हणून पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावी इंग्रजी पर्यंत वर्ग वाढविण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी करताना खासगी शाळांपेक्षा महापालिकेच्या शाळा अधिक उत्कृष्ट करण्याचा दावा केला. 

नाशिक, ता. 6- महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारताना खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत विद्यार्थी मागे राहू नये म्हणून पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावी इंग्रजी पर्यंत वर्ग वाढविण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी करताना खासगी शाळांपेक्षा महापालिकेच्या शाळा अधिक उत्कृष्ट करण्याचा दावा केला. 
कालिदास कलामंदीर मध्ये आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलतं होत्या. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या शाळा दत्तक देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या महिन्यातील महासभेत स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी पालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सिबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. महापौर भानसी यांनी सदरचा प्रस्ताव दफ्तर दाखल केला. सिबिएसई पॅटर्न ऐवजी दहावी पर्यंत तुकड्या वाढवून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याची घोषणा केली. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पालिकेच्या विद्यार्थ्यांना झेपवेल असा दावा केला. दहावी पर्यंत तुकड्या वाढविताना बी.एड., डि.एड. चे शिक्षक मानधनावर घेण्याची घोषणा त्यांनी केली. महापालिकेच्या शाळांकडे पायाभुत सुविधा उत्तम असल्याने विद्यार्थ्यांसाठी त्याचा चांगल्या पध्दतीने नियोजन करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

शिक्षकांसमोर आव्हान- गमे 
महापालिकेच्या एकुण शाळांपैकी तीस टक्के शाळा प्रगत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. याचाचं अर्थ सत्तर टक्के शाळा प्रगत करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. भविष्याचा वेध घेवून विद्यार्थ्यांना प्रगत करावे, विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून गुणवत्तेत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews NMC School