गंगापूर धरणात महापालिकेचे जलपुजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नाशिक, ता. 27 ः शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 97 टक्के भरल्याने परंपरेप्रमाणे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाण्याचे मंगळवारी (ता. 27) विधिवत पूजन करण्यात आले. महापौर रंजना भानसी व पोपट भानसी यांच्या हस्ते जलपूजन झाले. धरणात नारळ अर्पण करण्यात आला.

नाशिक, ता. 27 ः शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 97 टक्के भरल्याने परंपरेप्रमाणे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाण्याचे मंगळवारी (ता. 27) विधिवत पूजन करण्यात आले. महापौर रंजना भानसी व पोपट भानसी यांच्या हस्ते जलपूजन झाले. धरणात नारळ अर्पण करण्यात आला. आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृहनेते सतीश सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक भगवान दोंदे, शिवाजी गांगुर्डे, प्रशांत जाधव, अजिंक्‍य साने, रूची कुंभारकर, गणेश गिते, संतोष गायकवाड, गजानन शेलार, नंदिनी बोडके, छाया देवांग, प्रियंका माने, पुष्पा आव्हाड, प्रियंका घाटे, अर्चना थोरात, दीक्षा लोंढे, सरिता सोनवणे, कल्पना पांडे, प्रतिभा पवार, राजेंद्र महाले, स्वाती भामरे यांच्यासह अधिकारी अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उपअभियंता अविनाश धनाईत, पाटबंधारे विभागाचे सुभाष मिसाळ, अनिल वाघ आदींनी पूजा करून नारळ अर्पण केला. सुयोग देव यांनी पौराहित्य केले. दरम्यान, जलपूजनाच्या कार्यक्रमाला शहरातील तिन्ही आमदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता.

आरक्षण कमी होण्याची शक्‍यता
गंगापूरव्यतिरिक्त मुकणे धरणातून शहरासाठी 300 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. ऑक्‍टोबरमध्ये पाण्याची मागणी नोंदविताना यंदा नऊशे दशलक्ष घनफूट पाणी मागितले जाणार आहे. मुकणे धरणातून मागणीनुसार पाणी आरक्षित झाल्यास गंगापूर धरणातील आरक्षित पाणी कमी होण्याची शक्‍यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews pujan