नगरपरियोजनेचे उद्देश राजपत्रात जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नाशिक, ता. 14- एरव्ही मंजुर झालेला विषयाचा ठराव प्रशासनाकडे येताना महिन्या भराचा कालावधी लागतो परंतू स्मार्ट सिटी अंतर्गत नगरपरियोजना राबविण्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर तातडीने एका दिवसात प्रशासनाला ठराव प्राप्त होवून नगरपरियोजना राजपत्र जाहीर करण्यात आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण होवू नये म्हणून तातडीने राजपत्रात जाहिर करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी उच्च न्यायालयात दावा दाखल असल्याने न्यायालयाने निर्णय देण्यापुर्वीचं घाईघाईत प्रक्रिया पुर्ण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

स्मार्ट सिटीच्या हरितक्षेत्र विकासांतर्गत मखमलाबाद व नाशिक शिवारातील मखमलाबाद येथे नगरपरियोजना राबविण्याचा विषय गेल्या दिड वर्षांपासून वादात अडकला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नगरपरियोजनेच्या उद्देश जाहीर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी योजना राबविताना शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, तसे झाल्यास स्वत: योजनेची अधिसूचना रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर महापौरांनी तातडीने प्रशासनाकडे ठराव पाठविला. विशेष म्हणजे ज्या दिवशी ठराव पाठविला त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना देखील महापौर भानसी यांनी दाखविलेली तत्परता चर्चेला कारणीभुत ठरली आहे. प्रशासनाला ठराव प्राप्त झाल्यानंतर तातडीने नगरपरियोजनेच्या उद्घोषणेचे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार उद्देशाची नक्कल व मौजे नाशिक व मौजे मखमलाबाद येथील नगररचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र गुलाबी रंगाने दर्शविण्यात आले असून त्याची प्रत महापालिका मुख्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय व नाशिकरोडच्या नगररचना सहसंचालक कार्यालयात पाहता येणार आहे. 
या जागेवर योजना 
मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नं. 16,17,18 (पै.), 24 ते 69, 424, 999, 1000 ते ,1003, 1011 मधील 226.63 हेक्‍टर क्षेत्र तसेच मौजे मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक 96, 98 ते 110, 141 (पै.) 142, 143 (पै.), 473, 478, 479 मधील 78.10 हेक्‍टर असे एकुण 753 एकर क्षेत्रावर नगररचना परियोजना होणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews Smart TP Scheme