महापालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

live
live


नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा. भविष्यात कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतील याचा विचार करून पालिका शाळांच्या विद्यार्थ्यांमधील न्युनगंड नष्ट करण्याचे आवाहन सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी केले. 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनिय कार्य केलेल्या शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आज महाकवी कालिदास कलामंदीर मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. माने बोलत होते. महापौर रंजना भानसी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना श्री. माने म्हणाले, समाज मनावर खासगी कॉन्व्हेन्ट शाळांचे गारुड तयार झाल्याने त्यातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये न्यूनगंडाची भावना तयार झाली आहे. परंतू असे असले तरी प्रतिकुल परिस्थितीत मात करण्याची उर्मी महापालिकेच्या शाळांमधूनचं निर्माण होते त्यामुळेचं सरकारी शाळांमधून शिक्षण घेतलेलेचं महापुरुष तयार झाले आहेत. नवी पिढी नवे स्वप्न घेवून येते त्या स्वप्नांना दिशा देण्याची महत्वपुर्ण भुमिका शिक्षकांना बजवावी लागणार आहे. सध्याचा शैक्षणिक विकास हा जॉब लेस प्रकारचा आहे. त्यामुळे भविष्यात कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होवू शकतात याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. तंत्रज्ञानाचे बदल शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवणात आई या महत्वपुर्ण घटकाचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. विद्यार्थी शंभर टक्के गुणवत्तेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते सतीश सोनवणे, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेत्या नंदीनी बोडके, रिपाई गटनेत्या दिक्षा लोंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती हेमलता कांडेकर, शिक्षण समितीच्या सभापती सरिता सोनवणे, उपसभापती प्रतिभा पवार, समिती सदस्य वर्षा भालेराव, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, सातपूर प्रभाग समिती सभापती संतोष गायकवाड, नगरसेवक शशिकांत जाधव, रंजना बोराडे, कल्पना पांडे, भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, रुपाली निकुळे आदी उपस्थित होते. 

आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी 
सन 2016-17- शोभा वाजे, रंगनाथ चव्हाण, नंदा शेळके, अंजली तांबे, दत्तात्रय सुर्यवंशी, संगिता धनवटे, जयश्री रकिबे, विजय कवर, राजेश अमृतकर, सैय्यद नसीम मीरसजनअली, विठ्ठल नागरे, गिता हिरे, पौर्णिमा पंडीत, चारुदत्त सोनवणे, राजेश भुसारे, हरीकृष्ण सानप, रोहिणी जोशी, प्रतिभा पटेल, आरेफुन्निसा अहमद शेख. 

सन 2017-18- कल्पना पाटील, श्रीकृष्ण आवारे, अर्चना खरात, राजू दातीर, सुनंदा बेलदार, राजश्री खोडके. 

सन 2018-19- छाया तिवडे, सोमनाथ गावित, नितीन वाजे, सुरेश खांडबहाले, कविता वडघुले, जयंत येवला, सावली शिरसाठ, शिवाजी शिंदे, भूपेंद्र शुक्‍ल, दीपाली रायते, सुवर्णा थोरात, सुवर्णा जोपळे, सुगंधा सोनवणे, लक्ष्मी कस्तुरे, विष्णू आव्हाड, सुनीता जाधव, अरुण दातीर, विशेष पुरस्कार- कुंदा जाधव. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com