अकरावीच्या विशेष गुणवत्ता यादीचा कट-ऑफ नव्वद टक्‍यांचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष गुणवत्ता यादी बुधवारी (ता.14) जाहिर झाली आहे. या यादीत 4 हजार 107 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवार (ता.16) पासून सोमवार (ता.19) पर्यंत प्रवेश निश्‍चितीची मुदत असेल. विशेष गुणवत्ता यादीतही नामांकित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या अनुदानित जागांसाठी प्रवेशासाठी असलेली चुरस लक्षात घेता कट-ऑफ नव्वद टक्‍यांपेक्षा अधिक बघायला मिळतो आहे.

राज्यातील अन्य शहरांप्रमाणे नाशिक महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांतही ऑनलाईन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. आतापर्यंत पार पडलेल्या तीन फेऱ्यांमध्ये विज्ञान शाखेतील प्रवेशासाठीच सर्वाधिक चुरस बघायला मिळाली होती. यानंतर जाहिर केलेल्या विशेष गुणवत्ता यादीतही निवड केलेल्या 4 हजार 107 नावांपैकी विज्ञान शाखेसाठी इच्छुक असलेल्या 1 हजार 823 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या पसंतीक्रमांकाच्या आधारे 1 हजार 785 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या पसंतीक्रमाचे 742 व तिसऱ्या पसंतीक्रमाचे 515 विद्यार्थी आहेत. या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी सोमवार (ता.29) पर्यंत मुदत असेल. 

नव्वद टक्‍यांच्या घरात कट-ऑफ 
विशेष गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांतील विज्ञान शाखेच्या अनुदानित जागांच्या प्रवेशासाठी करडी स्पर्धा बघायला मिळते आहे. आरवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ 92 टक्‍के राहिला. तर सिडकोतील केएसकेडब्ल्यू महाविद्यालयाचा कट-ऑफ 91.40 टक्‍के, केटीएचएचचा 90 टक्‍के इतका कट-ऑफ राहिला. वाणिज्य शाखेतील अनुदानित जागेच्या प्रवेशासाठी बीवायके महाविद्यालयाचा कट-ऑफ 92.60 टक्‍के इतका आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnews11thadmission