भोंदू बाबाला भिवंडीतून अटक 

Residential photo
Residential photo

नाशिक : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमीष दाखवून पीडित महिलेवर ठिकठिकाणी नेऊन बलात्कार करणाऱ्या भोंदुबाबास गंगापूर पोलिसांनी भिवंडीतून अटक केली. विनोद बाबा उर्फ तुकाराम राधाकृष्ण हिरे (47, रा. श्रमिकनगर, ओझर) असे संशयित भोंदुबाबाचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ध्रुवनगर येथील पीडित महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी पाच संशयितांविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर मुख्यसंशयित व बलात्कार करणारा भोंदू बाबाला गंगापूर पोलिसांनी भिवंडी परिसरातून अटक केली आहे. तुकाराम हिरे उर्फ विनोद बाबा असे नाव असलेल्या या भोंदू बाबाला तीन बायका आहेत. यापूर्वीही त्याने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार केले असण्याची शक्‍यता आहे. न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस तपासातून आणखीही माहिती समोर येण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र दामोदर गायकवाड (53, रा. आंबे जानोरी), अशोक उर्फ नाना पिराजी पवार (रा. ओझर) यांना अटक केली. 
संशयितांसह भोंदू विनोद बाबा याच्यासह पाच संशयितांनी पीडितेला पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले होते. संशयितांनी सांगितल्याप्रमाणे पूजा विधी करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर जुन 2018 मध्ये पीडितेचे भोंदू बाबाशी लग्न झाल्याचे भासवून त्याने शिर्डी, सापुतरा, नाशिक अशा विविध ठिकाणी पुजेनिमित्त नेवून वेळोवेळी अत्याचार केले. तसेच मारहाण करून तिचा गर्भपातही केला. या अत्याचारास कंटाळून पीडितेने गंगापूर पोलीसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com