माजी नगरसेविकेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीला शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक, ता. 22 : सिडकोतील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रकरणी तत्कालिन नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन महिन्यांच्या कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली. किरण मोहिते असे आरोपीचे नाव असून 2011 मध्ये सदरची घटना घडली होती. 

सिडकोतील वॉर्ड क्रमांक 104 मधील भगवती चौकात जलकुंभांच्या विकासकामांचे उद्‌घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी आरोपी किरण मोहिते व सुभाष घरटे यांनी, याठिकाणी टाकीचे भूमीपूजन केले तर टाकीचे काम होऊ देणार नाही, असे म्हणत किरण मोहिते याने तत्कालिन नगरसेविकेचा हात पकडून ओढले होते. याप्रकरणी 24 नोव्हेंबर 2011 रोजी अंबड पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार आवारे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 
सदरचा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के. गावंडे यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. विद्या देवरे-निकम यांनी कामकाज पाहिले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्ष याआधारे न्यायालयाने आरोपी किरण मोहिते यास 3 महिने साधा कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर सुभाष घरटे याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल. पैरवी अधिकारी म्हणून एस.एस. देशमुख, आर. एम. उगले यांनी पाठपुरावा केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspolicejudgement