विसरू नका, प्रत्येक नाशिककर पोलीसच आहे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील : शहर शांतता समितीची बैठक

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सारेच उत्सुक आहात. परंतु या उत्सवात कुठेही कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही. याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे, तशीच प्रत्येक नाशिककरांचीही आहे आणि प्रत्येक नाशिककर पोलीसच आहे याची जाणीव प्रत्येकाने उराशी बाळगावी असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील : शहर शांतता समितीची बैठक

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सारेच उत्सुक आहात. परंतु या उत्सवात कुठेही कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही. याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे, तशीच प्रत्येक नाशिककरांचीही आहे आणि प्रत्येक नाशिककर पोलीसच आहे याची जाणीव प्रत्येकाने उराशी बाळगावी असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित शहर शांतता समितीच्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, सुहास फरांदे, माजी महापौर अशोक मुर्तडक, भक्तीचरणदास महाराज, शहर गणेश मंडळांचे अध्यक्ष समीर शेटे, उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, विजय खरात, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे उपस्थित होते. 
सदरच्या बैठकीमध्ये गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेतली जाईल असे सांगत, ज्या मंडळांना वाहतूक शाखेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यांनाही लवकरात लवकर परवानगी दिली जाईल. कायदा-सुव्यवस्थेचे पालन करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्‍तांनी केले. 
यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक गजानन शेलार, प्रतिभा पवार, सलीम शेख, वत्सला खैरे, आशा तडवी, शंकरराव बर्वे, देवांग जानी, पुरोहित संघाचे सतीश शुक्‍ल, रामसिंग बावरी, अशोक पंजाबी, अवधुत कुलकर्णी, पद्माकर पाटील, मंडलेश्वर काळे, निशीकांत पगारे, डॉ. मनिषा रौंदळ यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी केले. 

पोलीस-समिती पदाधिकाऱ्यांच्या सूचना : 
* डीजे व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव 
* विसर्जन मिरवणुकीला वेळेत प्रारंभ होऊन, वेळेत समारोप करावी 
* दहा वाजेनंतर देखावे खुले ठेवण्यास परवानगी द्यावी 
* मिरवणूकीत सहभागी मंडळांनी पंचवटी कारंजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा 
* गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अधिकाधिक भर द्यावा 
* वीजजोडणीसाठी रितसर महावितरणची परवानगी घ्यावी 
* गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेने प्रभागांतील रस्त्यांवरील खड्डे बुजवावे 
* बंद पथदीप सुरू करावेत 
* मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा 
* मंडळांच्या ठिकाणी अवैधरित्या जुगाराला बंदी 
* ध्वनीप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी 
* गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवक-पोलीस मित्रांनी सहकार्य करावे 

गणेशोत्सव मंडळांकडून काही सूचना आहेत ज्यावर लवकरात लवकर निर्णय घेतले जातील. प्रामुख्याने गणेशोत्सव आनंदाने साजरा करताना ÷उत्सवाला गालबोट लागणार नाही याचीही दक्षता घ्यावी. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspoliceshantatasamitimeeting