चुंभळे यांच्या जामिनावर आज सुनावणी 

Residential photo
Residential photo

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गेल्या शुक्रवारी (ता.16) रंगेहाथ अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली असून, सध्या ते उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता.19) सुनावणी होणार असून त्याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल चुंभळे यांना भेटण्यासाठी सातत्याने समर्थकांकडून गर्दी होते आहे. 

कंत्राटी कामगाराला पुन्हा कामावर रूजू करून घेण्यासाठी सभापती शिवाजी चुंभळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 6 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार, गेल्या शुक्रवारी (ता.16) दुपारी एक-दीड वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजी चुंभळे यांना दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली होती. तर, पथकाने त्यांच्या लेखानगर येथील पांडुरंग व गौळाणे येथील फार्महाऊसवर छापा टाकून रोकड, सोन्या-चांदी दागिने व मद्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी शनिवारी (ता.17) शिवाजी चुंभळे यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. मात्र, छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असले तरी, त्यांच्या समर्थकांकडून त्यांना भेटण्यासाठी गर्दी होते आहे. सातत्याने समर्थक त्यांना भेटण्यासाठी येत असून त्याचा अतिरिक्त ताण जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांवर पडतो आहे. तर, न्यायालयात उद्या (ता.19) होणाऱ्या त्यांच्या जामिन अर्जावरील सुनावणीकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, तक्रारदारास धमकावल्याप्रकरणी अजिंक्‍य चुंभळे याच्याविरोधातही पंचवटी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com