शिवाजी चुंभळे यांना जामीन मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना आज (ता.19) अखेर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर करताना, दर बुधवारी-गुरुवारी चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर हजेरी लावावी लागणार आहे. गेल्या शुक्रवारी (ता.16) शिवाजी चुंभळे यांना कंत्राटी कामगाराकडून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. 
 
गेल्या शनिवारी (ता.17) न्या. बी.ए. कुलकर्णी यांच्यासमोर सरकारी व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद होऊन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली असता, जिल्हा न्यायालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश दिले. तर जामीनासाठी अर्ज केला असता, त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अटीशर्तींच्या आधीन राहून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. 50 हजार रुपयांचा जातमुचलका, दर बुधवारी-गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजेरी, तक्रारदार-साक्षीदारांना त्रास न देणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी आदींसह अटीशर्ती आहेत. 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कंत्राटी कामगारास कामावरून कमी केले असता, त्याने पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी सभापती शिवाजी चुंभळे यांनी त्याच्याकडे 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 6 लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले. त्याचा पहिला हप्पा 3 लाख रुपये देण्यासाठी तक्रारदार गेल्या शुक्रवारी (ता.16) दुपारी बाजार समितीमध्ये सभापती शिवाजी चुंभळे यांच्या दालनात गेला. त्यावेळी सदरील लाचेची रक्‍कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगहाथ अटक केली होती. त्यांचे पांडुरंग निवासस्थान व गौळाणे येथील फार्महाऊसवर छापा टाकून रोकड, दागदागिने, मद्यसाठा, मालमत्तेची कागदपत्रे पथकाने जप्त केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspolicetrap