शिवाजी चुंभळे यांच्या अडचणीत वाढ 

live photo
live photo

नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचप्रकरणी अटक केली असता, त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 5 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला. याचप्रकरणी विभागाने चुंभळे यांचा ताबा मागितला असता, न्यायालयाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लाचप्रकरणी जामीन मंजूर झाला असला तरी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांना अटक केली जाण्याची शक्‍यता असल्याचे त्यांच्या अडचणी आणखी वाढच झाली आहे. 

बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना गेल्या शुक्रवारी (ता.16) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. जिल्हा न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर आज (ता.19) सुनावणी होऊन तो मंजूर झाला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, छाप्यादरम्यान चुंभळे यांच्या निवासस्थानी छापा टाकून 5 लाख 12 हजार 284 रुपयांचा अवैधरित्या देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. याचप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या मद्यसाठाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवाजी चुंभळे यांचा ताबा राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (ता.19) न्यायालयाकडे मागितला. गुन्ह्यात आढळून आलेल्या मद्यसाठ्याबाबत चौकशीसाठी संशयित शिवाजी चुंभळे यांचा ताबा मिळावा असा युक्तीवाद सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केला. त्यानुसार, न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या तुरूंगधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडीतील शिवाजी चुंभळे यांचा ताबा देण्याबाबतचे पत्र रवाना केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपासाधिकारी संतोष चोपडेकर यांचे पथक आज (ता.19) सायंकाळीपासून शिवाजी चुंभळे यांचा ताबा घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात ठाण मांडून होते. 
 
मुक्काम सिव्हिलमध्येच 
लाचप्रकरणात चुंभळे यांना जामीन मंजूर होऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. तर दुसरीकडे श्‍वसनाच्या त्रासामुळे गेल्या शनिवारपासूनच ते जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. जामीन मंजूर झाल्याने सायंकाळपर्यंत सुटका होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे कुटूंबियांसह समर्थकांची जिल्हा रुग्णालयाबाहेर गर्दी होती. जामीनावर सोडण्यापूर्वी त्यांना मध्यवर्ती कारागृहात नेऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार होती. परंतु, त्यांना श्‍वसनाचा त्रास बळावल्याने त्यांची जिल्हा रुग्णालयातून सुटका झाली नाही. त्यामुळे त्यांचा आजचा मुक्काम सिव्हिलमध्ये असून, उद्या (ता.20) सुटका झाल्यास राज्य उत्पादन शुल्क त्यांचा ताबा मध्यवर्ती कारागृहातूनच घेण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com