न्यू ग्रेस ऍकॅडमीच्या 74 मुलांना खाज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिक : बोरगड परिसरात असलेल्या न्यू ग्रेस ऍकॅडमीतील 74 मुला-मुलींना अचानक अंगाला खाज सुटल्याचा प्रकार सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बालरोगतज्ज्ञांनी या मुलांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडून देण्यात आले आहे. 

बोरगड परिसरामध्ये न्यू ग्रेस ऍकॅडमी ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आज दुपारच्या सुमारास काही मुले ही मैदानात खेळत असताना, अचानक दोन-चार मुलांना अंगाला खाज सुरू झाले. या खाजेचे प्रमाण अधिक वाढले आणि आणखी काही मुलांनीही तशाच तक्रारी केल्या. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांना 4 थी ते 6वीच्या वर्गातील सुमारे 74 मुलांना तात्काळ शाळेच्या बसमधून जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव धुम यांनी मुलांची तपासणी केली आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. साधारणत: तासा-दीडतासाने मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. शालेय बसमधून मुलांना परत नेण्यात आले. सदरील घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुलांची भेट घेऊन विचारपूसही केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewsschoolstudent