चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्त्या 

Residential photo
Residential photo

नाशिक : चेतनानगर येथे विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात पती, सासूसासरे यांच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मधुमती श्रीकांत शिंदे (40, रा. सप्तशृंगी बंगला, धात्रक फाटा, पंचवटी) असे विवाहितेचे नाव आहे. मधुमती यांनी सोमवारी (ता.19) चेतनानगर येथील तिरुमला आस्था इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी घेत आत्महत्त्या केली होती. विवाहितेचे वडील अरुण शंकरराव कडभाने (रा. विठाई बंगला, चेतनानगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पती श्रीकांत शिंदे, सासरे दशरथ शिंदे व सासू (रा. सप्तशृंगी बंगला, धात्रक फाटा) यांनी विवाहिते मधुमती हिला चेतनानगर येथे न राहण्याचा हटट धरत, तिची इच्छा नसातान पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करण्याचा आग्रह धरून तिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे विवाहितेने आत्महत्त्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात तिघांविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com