शहरात आजपासून हेल्मेट सक्ती मोहीम 

Residential photo
Residential photo

नाशिक : गतवर्षाच्या तुलनेत यंदा रस्ता अपघात आणि यात बळी जाणाऱ्यांमध्ये घट नोंदली गेली आहे. तर जे 57 दुचाकीस्वार अपघातात मृत्युमुखी पडले आहेत, ते हेल्मेट परिधान न केल्यामुळे बळी गेले आहेत. तर, 7 चारचाकीस्वार हे सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे दगावले आहेत. त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे उद्यापासून (ता.27) पुन्हा शहर परिसरात विशेष हेल्मेट सक्ती मोहीम राबविणार आहेत. हेल्मेट सक्तीप्रमाणेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाणार आहे. 

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या आदेशान्वये उद्यापासून (ता.27) येत्या शनिवारपर्यंत (ता.31) पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विशेष हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जाणार आहे. सदरच्या मोहिमेत शहर वाहतूक शाखेसह पोलीस ठाण्यांचाही फौजफाटा रस्त्यावर उतरून बेशिस्त वाहनचालकांवर दंडाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारणार आहे. गतवर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या आठ महिन्यात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अपघातांचे प्रमाण जसे घटले आहे, तसेच अपघाती मृत्युंचे प्रमाणही घटले आहे. विशेषत: हेल्मेटचा वापर वाढल्यामुळे अपघाती मृत्युचे प्रमाणात घट झाली आहे. त्यासाठी उद्यापासून राबविल्या जाणाऱ्या या विशेष मोहिमेत वाहतुकींच्या नियमांची जनजागृतीही केली जाणार आहे. हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावणे, वाहतूक नियमांचे पालन, सिग्नलचे पालन करण्याचे आवाहन करतानाच ट्रीपलसीट, धोकादायक वाहन चालविणे याबाबत जनजागृती केली जाणार आहे. 

वाहनचालकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे नाशिककरांना आवाहन करतो. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक. 


वर्षे फेटल अपघात एकूण मयत गंभीर अपघात किरकोळ अपघात एकूण जखमी एकूण अपघात 
जानेवारी ते जुलै 2018 120 123 179 41 346 347 
जानेवारी ते जुलै 2019 93 98 168 52 326 316 
वाढ/घट 27 ने कमी 25 ने कमी 11 ने कमी 11ने जास्त 20 ने कमी 31 ने कमी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com