औषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी

औषध व्यापार 'बंद' आंदोलनात साक्री तालुका केमिस्ट सहभागी

निजामपूर-जैताणे (धुळे) : साक्री तालुक्यातील निजामपूर, पिंपळनेर, दहीवेल, कासारे व म्हसदी येथे केमिस्ट असोसिएशनच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच औषध विक्रेत्यांच्या बैठका घेऊन 28 सप्टेंबरच्या 'व्यापार बंद' संदर्भात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. 20 सप्टेंबरपासून साक्री तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून ऑनलाईन औषधविक्री तसेच ई-पोर्टलच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू केले आहे.

28 सप्टेंबरला राष्ट्रीय संघटनेने पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये साक्री तालुक्यातील सर्व मेडिकल दुकानदार दुकाने बंद ठेवणार असून साक्री येथे मोर्चासह तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष धनंजय सोनवणे, सचिव रामदास माळी यांनी कळविले आहे.

संघटना ऑनलाइनच्या विरोधात नाही पण ऑनलाइनमुळे जनस्वास्थ्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. तरुणांमध्ये सहज मिळणाऱ्या नारकोटिक (गुंगी आणणाऱ्या) औषधांमुळे व्यसनाधीनता वाढू शकते, गर्भपाताच्या गोळ्या, औषधे सहज उपलब्ध होतील. शिवाय ऑनलाइन औषधांच्या गुणवत्तेची तपासणी कोण करणार? औषधांच्या योग्य साठवणूकीचे काय? रुग्णास तात्काळ लागणाऱ्या औषधांचे काय? अशा अनेक अनुचित बाबी आहेत. त्यामुळे ऑनलाइन औषधविक्री योग्य नाही. मग ई-फार्मसीची घाई का केली जाते आहे? ऑनलाइनमुळे प्रतिबंध केलेली औषधे व निकृष्ट औषधे यामुळे जनसामान्यांच्या आरोग्यावर संकट येऊ शकते, त्याविरोधात संघटना असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
 
केमिस्ट लोकांना औषधविक्री करताना जे नियम व निर्बंध आहेत ते ऑनलाइन औषध विक्रीत दिसत नाही. मात्र ऑनलाइन विक्रेत्यांना डॉक्टर प्रिस्क्रिप्शनचे व्हॅलिडिटीबद्दलचे कोणतेही नियम नाहीत. वरील सर्व बाबींचा विरोध करण्याकरिता संपूर्ण भारतात औषधी व्यापार 'बंद' ठेवण्याचा निर्णय झाला आहे. हा 'बंद' वैयक्तिक नसून देशहितार्थ आहे. देशातील युवकांच्या हितासाठी आहे, अशी माहिती माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक व औषध विक्रेता हर्षदराय गांधी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com