राज्यातील मोबाईल शिक्षकांची वेतनवाढऐवजी वेतन कपात

जगन्नाथ पाटील 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कापडणे (ता.धुळे) : सातवा वेतनानुसार वेतन व्हावे, फरक मिळवा आदी मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन झाले. प्राथमिक शिक्षकांना एक वेतनवाढही लागू झाली आहे. मात्र याच कालावधीत विशेष फिरते शिक्षक अर्थात मोबाईल टीचर यांची पगारवाढ तर झालीच नाही. उलट एप्रिलपासून पगार कमी करुन त्यांच्याकडून फरक असलेली रक्कम सक्तीने वसुल करण्याचा फतवा शासनाने काढला आहे. यामुळे मोबाईल टीचर संतापले असून एवढा अन्याय कशासाठी असा सवाल उपस्थित केला. राज्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांवर हा अन्याय झाला आहे.
     
2006 पासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत फिरते विशेष शिक्षक हे पद दिव्यांग विद्यार्थ्यां साठी निर्माण केले आहे. हे विशेष शिक्षक दिव्यांगांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक सेवा सुविधांसाठी कार्यरत आहे. अंध, अल्प अंध, अस्थिव्यंग,  मतिमंद आदी विशेष विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत. उन्हाळी शिबिरात सातत्यपुर्ण प्रयत्नशिल असतात.

दोन हजार शिक्षकांवर अन्याय

हे विशेष शिक्षक धुळे एकवीस, नंदूरबार चार, जळगाव पन्नास आणि राज्यात एकूण 1946 आहेत. 2006 पासून मानधनावर काम करीत आहेत. त्यांचे एप्रिल 2018 पासून एक हजार पाचशे एवढे दरमहा वेतन कपातीचे आदेश सर्व शिक्षा अभियानने शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. वेतन वाढ देण्याऐवजी कपात होत असल्याने शिक्षकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. अन्याय दूर करण्याची मागणी आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली आहे.

वेतन वसुलीचे शिक्षणांधिकार्‍यांचे आदेश 

प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिर्‍यांनी वेतन पथकाला शिक्षकांनी एप्रिल, मे व जूनमधील वसुलीचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील पगार प्रती महिना वीस हजारप्रमाणे करण्याचे नमूद केले आहे. 1946 शिक्षकांमधून 7 कोटी 75 लाख 7 हजार एवढी रक्कम वसूल होणार आहे.

दरम्यान  वेतनवाढबरोबर नियमित शिक्षक म्हणून कायम करण्याची मागणी होती. उलट मानधनातून वेतन कपात केल्याने राज्य संघटना आंदोलन छेडणार आहे.

विशेष शिक्षकांची वर्षनिहाय वेतन
शैक्षणिक
 वर्ष     वेतन

2006-07  - 4800

2007-08   - 7500

2008-09  -  9000

2010-11 - 12000

2012-13  -13000

2013-14  - 15250
2015-16  - 16650

2016-17  -20000

2017-18  - 21500

2018-19   - 20000 (1500ची कपात)

विशेष शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वेतन संदर्भांत शासनाने सकारत्मक निर्णय घ्यावा.  वेतन श्रेणी नुसार राज्य ने वेतन निश्चिती करावी. अन्यथा त्रीव आंदोलन केले जाईल.
किशोर वैरागर, राज्याध्यक्ष विशेष शिक्षक संघटना

Web Title: salary cut for mobile teachers in the state