नाशकात सलमानच्या फॅन्स ग्रुपने केला 'भारत'चा फस्ट डे फस्ट शो बुक (व्हिडीओ)

अरूण मलानी
बुधवार, 5 जून 2019

  • नाशकात 'सलमान भाई की जय हो, भारतमाता की जय'च्या घोषणा
  •  'भारत' चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त कॉलेजरोडला काढली कार रॅली
  • फस्ट डे फस्ट शोची संपूर्ण तिकीटे केली होती बुक

नाशिक : रमजान ईदचा मुहूर्त साधत सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'भारत' चित्रपट प्रदर्शित झाला. नाशिकमधील आशिष सिंघल यासह सलमान खानच्या फॅन्सनी कॉलेजरोडवरील सिनेमॅक्‍स (पीव्हीआर मल्टीप्लेक्‍स) येथे फस्ट डे फस्ट शोची संपूर्ण तिकीटे बुक केली होती.

bharat

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमधील सलमानच्या फॅन्सकडून हा अनोखा प्रयोग राबविला जात आहे. याअंतर्गत सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होतांना 'फस्ट डे, फस्ट शो' बुक केला जात असतो. ईदनिमित्त 'भारत' प्रदर्शित होत असतांना त्याच्या फॅन्सने आधीच सकाळी साडे आठचा शो बुक करून ठेवला होता.

ठरल्याप्रमाणे सर्व फॅन्स आठच्या सुमारास कॉलेजरोड परीसरातील विठ्ठल मंदिर चौकात जमले होते. तिरंगा फडकवतांना 'भारत' चित्रपटाचा पोस्टर असलेल्या खुल्या जिपपाठोपाठ आलीशान कारची रॅली कॉलेजरोड परीसरात काढण्यात आली. रॅलीत 'सलमान भाई की जय हो, भारतमाता की जय'च्या घोषणा दिल्या. सलमानसारखीच बॉडी बनवलेल्या एका फॅनने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. सिनेमॅक्‍सपर्यंत पोहचताच ढोल-ताशांच्या गजर करण्यात आला. सिनेमागृहातील पोस्टरला माळा घालत विविध पद्धतीने चित्रपट प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्‍त केला. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khans fans celebrating for Bharat released at Nashik