मीठाच्या गोण्यांची नंदुरबारमध्ये लूट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

देशभरातील अफवेचा परिणाम; सौम्य लाठीमार
नंदुरबार - मीठाच्या किमती लवकरच मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची अफवा मुंबईसह राज्यात पसरली. त्यामुळे येथील हाट दरवाजा परिसरात किराणा दुकानासमोरून मिठाच्या गोण्यांची अक्षरशः लूट करण्यात आली. दरम्यान, या वेळी जमलेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. शुक्रवारी (ता. 11) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

हाट दरवाजा भागातील किराणा दुकानदारांपैकी अनेकांच्या मिठाच्या गोण्या दुकानाच्या बाहेर रचलेल्या असतात. काल रात्री अफवा पसरताच काहींनी दुकानासमोर ठेवलेल्या मिठाच्या गोण्या उचलून नेल्या. या वेळी या भागात मोठी गर्दी जमा झाली होती. दुकानमालकांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. दुकानाबाहेर असलेल्या मिठाच्या गोण्या सुरक्षित ठेवल्या.

Web Title: salt theft in nandurbar

टॅग्स