संभाजी भिडेप्रकरणी शुक्रवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नाशिक - वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेची बाजू ऐकून घेतली. पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी (ता. 10) होणार आहे. नाशिकमध्ये गेल्या 10 जूनला झालेल्या सभेत भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लेक लाडकी अभियानतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने भिडे यांना नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. भिडे चौकशीला उपस्थित न राहिल्याने महापालिकेने त्यांच्याविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला.
Web Title: Sambhaji Bhide Crime Result