संभाजी भिडेंना तूर्त दिलासा नाही; न्यायालयात व्हावे लागणार हजर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नाशिक : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कनिष्ठ न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्या नोटिसीविरोधात भिडे यांनी आव्हान दिले असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने ते फेटाळून लावले आहे. त्यामुळे भिडेंना यांना आता कनिष्ठ न्यायालयात हजर व्हावे लागण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात येत्या शुक्रवारी (ता.7) सुनावणी होणार आहे. 

संभाजी भिडे यांनी गेल्या मे महिन्यात नाशिकमध्ये आयोजित सभेदरम्यान संततीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे चौकशी करून कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे. परंतु संभाजी भिडे अद्याप एकाही सुनावणीवेळी हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने भिडे यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीविरोधात भिडे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर गेल्या आठवड्यात संभाजी भिडे यांच्यातर्फे अॅड. अविनाश भिडे, तर सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला होता. त्यावर आज सुनावणीवेळी जिल्हा व सत्र न्यायधीश एन.जी. गिमेकर यांनी भिडे यांचा दावा फेटाळून लावला.  

संभाजी भिडे यांनी मुदतीमध्ये आव्हान दिले नाही. तसेच, त्यासंदर्भातील माफीनामाही न्यायालयाकडे दिला नाही. त्याआधारे भिडे यांना बजाविण्यात आलेल्या नोटिशीविरोधातील दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याविरोधात भिडे हे उच्च न्यायालयातही दाद मागण्याची शक्‍यता आहे. मात्र, आता कनिष्ठ न्यायालयात येत्या शुक्रवारी (ता.7) असलेल्या सुनावणीवेळी भिडे यांच्या उपस्थित राहतात का, याकडे लक्ष राहील.

Web Title: Sambhaji Bhide does not have any relief till now