मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता..दाखल गुन्हे मागे घेणार : मुख्यमंत्री

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

आज (ता.९) मंत्रालयात तालुक्याचे शिवसेना नेते संभाजी पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील पिंपळगाव टोलनाका व देवळणे चौफुलली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात दाखल झालेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी निवेदन स्वीकारतांना ठाकरे यांनी हे आश्वासन दिले.

नाशिक : येवला तालुक्यातील पिंपळगाव टोलनाका व देवळाणे चौफुली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे गभीर व चुकीचे आहे. याबाबत मी स्वतः तिथे आलो होतो. तेव्हा गुन्हे मागे घेणार असा शब्द दिला आहे. लवकरच गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील शिवसेना नेते संभाजी पवार यांना दिले.

येवल्यातील आंदोलनात गुन्हे मागे घेण्याची संभाजी पवारांची मागणी

आज (ता.९) मंत्रालयात तालुक्याचे शिवसेना नेते संभाजी पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्यातील पिंपळगाव टोलनाका व देवळणे चौफुलली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात दाखल झालेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी निवेदन स्वीकारतांना ठाकरे यांनी हे आश्वासन दिले. शेतमालाला भाव व कर्जमाफीसाठी १ जून २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन छेडले गेले होते. त्यावेळी येथील पिंपळगाव जलाल येथे काही समाजकंटकांनी आंदोलनाला हिसंक वळण दिले होते. शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यावर दरोड्यासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यादरम्यान रात्री २ वाजता उद्धव ठाकरेंनी फोन करून संभाजी पवार यांना आदेश दिला होता की,अटक झाली तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे रहा याची देखील आज आठवण झाली. 

गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय द्या

पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,राज्यातील सगळ्यात मोठे आंदोलन पिंपळगाव टोलनाक्याजवळ झाले होते.या आंदोलनात आंदोलकांवरती सरकारने सूडबुद्धीने कारवाई दरोड्यासारखे भयानक कलम लावून गुन्हे दाखल केले आहेत.त्यावेळेस आपण स्वतः पिंपळगाव येथे येऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन देखील दिले आहे. तसेच येवला - औरंगाबाद महामार्गावर देवठाण फाटा येथे पालखेड डावा कालव्याच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते.त्यांच्यावर देखील सूडबुद्धीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही आंदोलनातील आंदोलनात शेतकर्यांवर झालेला अन्याय दूर करून यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय द्या अशी विनंती पवार यांनी केली.

हेही वाचा >  "अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं याला माझा विरोध नाही"

मुख्यमंत्री सकारात्मक असून शेतकऱ्यांना नक्की न्याय देतील

“शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलने केले होते.असे असतांना दरोड्यासारखे गंभीर गुन्हे आकसाने दाखल झालेले आहेत.त्यावेळी या गावात भेटीत स्वत उद्धव ठाकरे यांनी हि बाब मान्य केली होती.तेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून शेतकऱ्यांना नक्की न्याय देतील. - संभाजी पवार,अध्यक्ष,जिल्हा मजूर फेडरेशन

हेही वाचा  > तीन वर्षांची 'ती' चिमुकली सर्वांचीच लाडकी...पलंगावर खेळत होती...अचानक..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Pawar demands withdrawal of crimes in Yeola movement to CM Nashik Marathi News