बागलाण तालुक्यात चंदन तस्करी जोरात

दीपक खैरनार
रविवार, 20 मे 2018

अंबासन (नाशिक) : गाव व परिसरात चंदन तस्करांचा सुळसुळाट वाढला आहे. पहाटेच्या अंधारातच तस्करांकडून चंदनाच्या झाडांची तोड करून त्यातील चंदन लंपास करण्यात येत आहे. येथील शिरवाळ नाल्यालगत भूषण कोर आणि मालेगाव-नामपुर रस्त्यावरील पवार यांच्या शेतातील चंदनाची डेरेदार वृक्ष अज्ञात चंदन तस्करांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने चंदन तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. अशा वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दिवसाकाठी या भागात फिरून चंदनाची झाडे कोठे आहेत याची रेकी तस्करांकडून केली जाते. रात्री किंवा पहाटेच्या दरम्यान ग्रुपने येऊन या भागातील चंदनाच्या झाडाच्या बाजूने आरीच्या साहाय्याने झाडाचा बुंधा कापुन त्यातील चंदन लंपास करीत आहेत. तोडलेल्या झाडांच्या फांद्या त्याच ठिकाणी टाकून पसार होत आहेत. मात्र, एवढे मोठी झाडे तोडलेली दिसूनही वन विभाग गप्प कसा असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. 
दोन वर्षांपूर्वी याच भागातील शेतकरी रामचंद्र कोर यांनी त्यांच्या शेतातील चंदनाचे झाड कापत असणाऱ्या चंदन तस्करांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तस्करांनी कोर यांच्यावर जीवघेणा हल्ला करून पळ काढला होता. अजूनही या हल्लेखोरांचा तपास लावण्यात संबंधित विभागाला यश आले नाही. यामुळे परिसरात चंदन तस्कर सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुषण कोर व पवार यांच्या शेतातील चंदनाची डेरेदार वृक्ष अज्ञात चंदन तस्करांनी चोरून नेली आहेत. 

Web Title: sandal smuggled in Baglan taluka