श्‍यामची आई संस्कारमालेतून समाजप्रबोधन

प्रशांत कोतकर
सोमवार, 24 डिसेंबर 2018

नाशिक - शंभराहून अधिक वर्षांपूर्वी, परंपरावादी, नऊवारी, लुगड्यातील, चूल आणि मूल हेच विश्‍व असलेल्या मातेने उपदेशातून श्‍याम घडविला. असे श्‍याम घडविण्याचे काम स्वनिर्मित मातृस्मृती प्रकल्पाद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक अनिल तुकाराम सिनकर हे गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत.

नाशिक - शंभराहून अधिक वर्षांपूर्वी, परंपरावादी, नऊवारी, लुगड्यातील, चूल आणि मूल हेच विश्‍व असलेल्या मातेने उपदेशातून श्‍याम घडविला. असे श्‍याम घडविण्याचे काम स्वनिर्मित मातृस्मृती प्रकल्पाद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक अनिल तुकाराम सिनकर हे गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत.

कौटुंबिक ज्ञानपीठात मुलांना घडविणाऱ्या अनौपचारिक विद्यार्थीकेंद्रात मातृशिक्षण पद्धतीचा मुख्य घटक मातृसंस्कार म्हणजेच आईचा उपदेश. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी मातेने उपदेशातून श्‍याम घडविला. आजची आई मोबाईल संगणक युगातील. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, घरकामासोबत आर्थिक भार पेलणारी. भूतकाळ आणि वर्तमानकाळातील आईचे एकच ध्येय होते, आहे व असेलच ते म्हणजे आपल्या मुलांना संस्कारित करणे.

शंभराहून अधिक वर्षांपूर्वीच्या श्‍यामच्या आईच्या उपदेशावरून आजच्या आईने आजच्या श्‍यामला कसे घडवावे...? कोणत्या कृती करवून घेतल्या पाहिजे, याचे धडे मातृस्मृती प्रकल्पाचा एक भाग असलेल्या श्‍यामची आई संस्कारमालेतून शिक्षक अनिल सिनकर हे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये समाजप्रबोधन करीत आहेत. या संस्कारमालेत श्‍यामची आई कथामालिका कोणी व कधी लिहिली, रात्र म्हणजे काय, श्‍याम कोण होता, श्‍यामची आई कथामालिका म्हणजे काय, स्वालंबनाची शिकवण, स्वाभिमानाचे रक्षण, भित्तचित्रांवरून पाठाचे वाचन, कृतियुक्त खेळात विद्यार्थी- आईचा सहभाग, आम्ही सगळे परिवारातील बंधू-भगिनी आयुष्यभर आपल्या आई-वडिलांचे ऐकणार आणि त्यांची सेवा करणार, अशी मातृप्रतिज्ञा देत संस्कारमालेची माळ सिनकर हे विद्यार्थ्यांकडून जपून घेत आहेत.

गाव मंदिरावरच मातृस्मृती प्रकल्प
काही दिवसांपूर्वी सुटीच्या काळात नांदगाव तालुक्‍यातील श्री क्षेत्र कऱ्ही या गावी सगळे परिवाराच्या मदतीने अनिल सिनकर यांनी गावाच्या पारावर आपला मातृस्मृती प्रकल्प राबवित विद्यार्थ्यांना "श्‍यामची आई'च्या संस्कारमूल्याची कृतीतून शिकवण दिली. यात त्यांच्या आई-वडिलांनाही सहभागी करून काही कृती करून घेतल्या. सन 2009 पासून विविध माध्यमांतून ते संस्कारमूल्याची शिकवण देण्याचे काम करीत आहेत.

Web Title: Sane Guruji Birth Anniversary