दोन रुपयात एटीएम मशीनद्वारे सॅनिटरी नॅपकिन

दिपक खैरनार
शुक्रवार, 16 मार्च 2018

अंबासन (नाशिक) : करंजाड (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीमार्फत फक्त दोन रूपयात किशोरवयीन मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनद्वारे सहजपणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा नॅपकिन एटीएम मशीनचा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. या सॅनिटरी नॅपकिन एटीएम मशीनचे शुक्रवारी (ता. १६) सरपंच उज्वला देवरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

ग्रामीण भागातील करंजाड हे अवघे तीन ते साडेतीन लोकसंख्या असणारे खेडेगाव आहे. किशोरवयीन मुली, महिलांसाठी ग्रामपंचायतीने सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सर्वप्रथम गावात जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतीने किशोरवयीन मुली व महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनमध्ये एकाच वेळी ३० सॅनिटरी नॅपकिन ठेवण्याची क्षमता आहे. या मशीनद्वारे केवळ २ रूपयांमध्ये एक नॅपकिन गावातील महिला व मुलींना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायतीने वेंडिंग मशीन ग्रामपंचायतीच्या शेजारीच असलेल्या अंगणवाडीबाहेर लावण्यात आले आहे. यामुळे गावातील किशोरवयीन मुली व महिलासाठी सॅनिटरी नॅपकिन घेणे सोयीस्कर झाले आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचा शुभारंभ करण्यासाठी ग्रामसेवक प्रमोद पाटील, सरपंच उज्वला देवरे, शामराव शेवाळे, रामदास देवरे, पंडित देवरे, राकेश देवरे, शाताराम देवरे, दिलीप देवरे, भिमराव पवार, भिमराव मोहिते, पोलिस पाटील प्रविण देवरे, जितेश देवरे, केवळ देवरे यांच्यासह किशोरवयीन मुली व महिला उपस्थित होते.

एक महिला सरपंच म्हणून आपण किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्याचबरोबर समाजात आज सुध्दा महिला सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यासाठी लाजतात त्यामुळे वापर होत नाही परिणामी त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून नाममात्र शुल्क आकारुन या उपक्रमाचा निर्णय घेतला, असे सरपंच उज्वला देवरे यांनी सांगितले. 

Web Title: Sanitary napkin by ATM machine at two rupees