संत गाडगेबाबा हे एक योगी : विवेक घळसासी

संत गाडगेबाबा हे एक योगी : विवेक घळसासी

सटाणा : विद्रोही आणि संवादशील परंपरेवर वैचारिक आघात करीत समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे पुण्य कर्म संत गाडगेबाबांनी केले. त्यांनी ज्ञान व उपासनेच्या मार्गाकडे कधीही पाहिले नाही. जाज्वल्य श्रमप्रतिष्ठा व उपासनेत रामापेक्षा श्रमाची प्रतिष्ठा मोठी मानून लोकांना क्रियाशील बनविण्याचे महान कार्य करणारे गाडगेबाबा हे एक योगी होते, असे प्रतिपादन प्रख्यात प्रकांड पंडित, विद्या वाचस्पती, उद्बोधक आणि ज्येष्ठ विचारक विवेक घळसासी यांनी काल शनिवार (ता.२५) रोजी येथे केले.

येथील सहकारमहर्षी (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील चेरीटेबल ट्रस्टतर्फे दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित 'वसंत व्याख्यानमाले' चे आज उद्घाटन झाले. यावेळी 'श्रमयोगी - गाडगे महाराज' या विषयावर पहिले पुष्प गुंफताना श्री. घळसासी बोलत होते. ते म्हणाले, टीळा, माळा, मुकुट, आखाडा, आसन, बैठक नसलेला हा अडाणी माणूस एखाद्या भिक्षेकरू सारखं आयुष्य जगला. सुखासिनतेचे त्यांना आकर्षण नव्हते. त्यांनी एकही अभंग रचला नाही. प्रबोधनाच्या राजमार्गावरून जाताना सामान्य माणूस व समाज केंद्रबिंदू मानून माणुसकीच्या क्षेत्रात त्यांनी समाजप्रेमाचा झेंडा उभारला. समाजक्षेत्रात वावरताना अन्य संतांसारखा ईश्वरी उपासनेचा धागा त्यांनी पकडला नाही. तुमच्या माझ्या जीवनात बदल करावयाचा असेल तर श्रमप्रतिष्ठा हवी. श्रम करणे हीच खरी उपासना आहे. वैचारिक सुराशी प्रामाणिक न होता, मानसिक परिवर्तनाशी त्यांनी दांभिकतेला उध्वस्त केले. श्रम करणे हीच ईश्वराची उपासना हे त्यांची शिकवण होती. भुकेलेल्यांना अन्न द्या, हा यज्ञ त्यांनी केला व अध्यात्मिक तत्वज्ञानाबरोबरच संत पदाची प्रतिष्ठा वाढविली, असेही श्री. घळसासी यांनी स्पष्ट केले.  

ट्रस्टचे अध्यक्ष व ज्येष्ठ हृद्यरोग तज्ञ डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला दर्शन सूर्यवंशी तर व बारावीतील हेमांगी महाजन (प्रथम, कला शाखा), ऋतुजा पाटील (प्रथम, वाणिज्य शाखा) व उमा जैन (प्रथम, विज्ञान शाखा) या विद्यार्थ्यांचा ट्रस्टतर्फे श्री. घळसासी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. व्ही. डी. पाटील, प्रल्हाद पाटील, श्यामकांत मराठे, कल्याणराव भोसले, डॉ. विजया पाटील, किशोर कदम, डॉ. चंद्रसेन पाटील, प्रा. जी. के. भदाणे, समीर पाटील, धनंजय सोनवणे, मुख्याध्यापक ए. डी. सोनवणे, उपप्राचार्य शांताराम गुंजाळ, तुषार महाजन, जगदीश कुलकर्णी, मनोज पाटील, दि. शं. सोनवणे, राजेंद्र भांगडिया, समको बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला, जयश्री गुंजाळ, संजय देसले, घनश्याम कापडणीस आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा.जितेंद्र मेतकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. आज रविवार (ता.२६) रोजी 'प्रेमाच्या गावा जावे' या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com