मालेगावचा झेंडा साता समुद्रापार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मालेगाव - येथील सारा एकबाल अन्सारी (वय 14) या दुबईस्थित विद्यार्थिनीने अमेरिकेतील न्यू हेवन येथील येल विद्यापीठात झालेल्या "वर्ल्ड स्कॉलर कप' टुर्नामेंट चॅंपियन्स स्पर्धेत सहा सुवर्ण व दोन रौप्यपदक मिळवून जगातील 50 देशांतील विद्यार्थिनींमध्ये "टॉप टेन'मध्ये येण्याचा बहुमान मिळविला. साराच्या या यशाने मालेगावचा झेंडा साता समुद्रापार फडकला आहे. 

जगातील 50 विविध देशांतील हुशार विद्यार्थिनींची स्थानिक पातळीवर स्पर्धा घेतली जाते. दुबई येथे झालेल्या स्पर्धेत साराने प्रथम मानांकन मिळविले. यानंतर बॅंकॉक येथील स्पर्धेतही तिने बाजी मारली. या दोन स्पर्धांतील यशानंतर तिची "वर्ल्ड स्कॉलर कप'साठी निवड झाली. साराने या स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत बाजी मारत सहा सुवर्णपदके पटकावली. सामाजिक अभ्यास व लेखन या अन्य दोन स्पर्धांत तिला दोन रौप्यपदक प्राप्त झाले. 18 ते 21 नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेत ही स्पर्धा झाली. साराने यापूर्वी दुबई व शारजा येथे विविध वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविले आहे. सारा द मिलिनियम स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. ती अभियंता एकबाल अन्सारी यांची कन्या असून, तिचे आजोबा इस्माईल अन्सारी येथील जेएटी नाइट स्कूलचे प्राचार्य होते. मालेगावचे हे अन्सारी कुटुंबीय दुबईत स्थायिक झाले आहे. साराच्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: sara ansari world scholar cup