सारंगखेडा चेतक महोत्सवात रंगल्या अश्‍वांच्या नृत्य स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

सारंगखेडा - डोळे दीपवणारे घोड्यांचे पदलालित्य, त्यांचा डौलदारपणा, खाटेवरील मनोवेधक नृत्य, आसमान झेप घेत नृत्य, अश्‍वावर उभे राहून मालकाने केलेले नृत्य अशा अनेक कलाप्रकारांनी येथील चेतक फेस्टिव्हल आज उत्तरोत्तर रंगत गेला. फेस्टव्हलचे वैशिष्ट्य असलेली अश्‍व नृत्य स्पर्धा आज मोठ्या उत्साहात झाली.

हजारो अश्‍वप्रेमींनी त्यांचा नृत्याविष्कार आपल्या डोळ्यांत साठविला.
येथील एकमुखी श्री दत्त यात्रोत्सवानिमित्त भरलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये आज अश्‍व नृत्य स्पर्धा झाली. तीत 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यातील पाच विजयी अश्‍वांची निवड करण्यात आली.

त्यांच्या क्रमांकांची घोषणा शनिवारी (ता. 29) बक्षीस वितरण सोहळ्यात होईल. स्पर्धेत गुजरातच्या वाघेला यांची मुन्नी घोडी, मध्य प्रदेशातील वडवणीतील सूर्या, राजस्थानच्या जव्हेर येथील कटरिना, महाराष्ट्रातील हिरापूरचा मोती आणि गुजरातमधील जानकी या पाच अश्‍वांची निवड झाली. नृत्य स्पर्धेत सर्वच अश्‍वांनी सादर केलेल्या नृत्यांना उपस्थित अश्‍वप्रेमींनीही दिलखुलास दाद दिली.

नृत्य स्पर्धेतील प्रथम विजेत्या अश्‍वाला एक लाखांचा, द्वितीय विजेत्यास 75 हजार, तृतीय विजेत्यास 50 हजार, चौथ्या विजेत्यास 25 हजारांचे, तर पाचव्या विजेत्या अश्‍वास सात हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उद्या (ता. 24) चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्‍वांची शर्यत होईल.

Web Title: Sarangkheda Chetak Mahotsav Horse Dance Competition