चेतक फेस्टिव्हल पन्नास देशांत पोहोचविणार - जयकुमार रावल

सारंगखेडा - चेतक फेस्टिव्हलचे उद्‌घाटन करताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल. शेजारी डॉ. विजयकुमार गावित, जयपाल रावल, कुमुदिनी गावित, नयनकुंवर रावल, विजय वाघमारे, अनिल पाटील, संजय पाटील, रेखा चौधरी, येनशिको यामाशिता, ओनिशी तात्सुतोरी, कात्या ड्रुझ आदी.
सारंगखेडा - चेतक फेस्टिव्हलचे उद्‌घाटन करताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल. शेजारी डॉ. विजयकुमार गावित, जयपाल रावल, कुमुदिनी गावित, नयनकुंवर रावल, विजय वाघमारे, अनिल पाटील, संजय पाटील, रेखा चौधरी, येनशिको यामाशिता, ओनिशी तात्सुतोरी, कात्या ड्रुझ आदी.

सारंगखेडा (ता. शहादा) - सारंगखेड्यासारख्या ग्रामीण भागातील यात्रा व येथील चेतक फेस्टिव्हल जगभरातील किमान पन्नास देशांत पोहोचविण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. आगामी काळात येथे पन्नास देशांतील पर्यटक येतील, असा विश्‍वास पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे व्यक्त केला. 

सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक फेस्टिव्हलचे उद्‌घाटन मंत्री रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल रावल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावित, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, पर्यटन विभागाचे विजय वाघमारे, आशुतोष राठोड, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, चंद्रशेखर जाधव, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, रेखा चौधरी, जपानचे शिष्टमंडळाचे प्रतिनिधी येनशिको यामाशिता, ओनिशी तात्सुतोरी, रशियाच्या छायाचित्रकार कात्या ड्रुझ, प्रांताधिकारी साताळकर आदी उपस्थित होते. 

श्री. रावल म्हणाले, की महाराष्ट्रातील पाच फेस्टिव्हलमध्ये सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील एका छोट्या गावाची यात्रा आता चेतक फेस्टिव्हलच्या नावाने विश्‍वाच्या पन्नास देशांत पोचत आहे. येत्या काळात येथे पन्नास देशातील पर्यटक अश्‍वांची माहिती घेतील.

अश्‍व बाजारात २७ लाखांची उलाढाल
यात्रा काळात चेतक फेस्टिव्हल होणार असून, त्यात उद्यापासून (ता. ४) ३ जानेवारीपर्यंत विविध उपक्रम होतील. नाट्य, चित्रपटगीते, सौंदर्य स्पर्धांसह महिलांसाठीच्या उपक्रमांचा समावेश आहे. चेतक फेस्टिव्हलतर्फे सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. येथील अश्‍व बाजारात आज दिवसभरात २७ लाख रुपयांच्या ८६ घोड्यांची विक्री झाली. आज सज्जाब जातीच्या घोडीला तब्बल दोन लाख ४० हजार रुपये किंमत मिळाली. अश्‍व बाजारात आतापर्यंत एक हजार ८०० घोड्यांची आवक झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com