भोळ्या ग्रामस्थांना फसवून सरपंचांनी केली 'अशी' हेराफेरी..उपसरपंचाकडून पर्दाफाश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

काटवन खोऱ्यात महड- बहिराणे गट ग्रामपंचायत आहे. अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोफत घरकुल बांधून दिली जातात. त्यानुसार आदिवासी भिल्ल समाजातील घरकुल लाभार्थी असलेल्या पांडू मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की यंदा घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतीत प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर प्रकरण मंजूर झाल्याने टेंभे येथील महाराष्ट्र बॅंकेच्या वैयक्तिक खात्यात शासनाकडून १५ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, सरपंच भाऊसाहेब धोंडगे यांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन बॅंकेच्या कागदावर अंगठे घेऊन स्वतःच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग केली. 

नाशिक : बहिराणे (ता. बागलाण) येथे शासनाकडून राबविलेल्या घरकुल योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सरपंचांनी वैयक्तिक बॅंक खात्यातून रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वर्ग केल्याची लेखी तक्रार लाभार्थ्यांनी बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळावा, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका उपसरपंचांनी घेतली आहे. 

बॅंकेच्या कागदावर अंगठे घेऊन स्वतःच्या बॅंक खात्यात रक्कम
काटवन खोऱ्यात महड- बहिराणे गट ग्रामपंचायत आहे. अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मोफत घरकुल बांधून दिली जातात. त्यानुसार आदिवासी भिल्ल समाजातील घरकुल लाभार्थी असलेल्या पांडू मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की यंदा घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतीत प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर प्रकरण मंजूर झाल्याने टेंभे येथील महाराष्ट्र बॅंकेच्या वैयक्तिक खात्यात शासनाकडून १५ हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र, सरपंच भाऊसाहेब धोंडगे यांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन बॅंकेच्या कागदावर अंगठे घेऊन स्वतःच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग केली. 

आदिवासी बांधवांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार 
याबाबत उपसरपंच मधुकर सोनवणे, माजी उपसरपंच गुलाब अहिरे यांनी सांगितले, की महड येथील अप्पा गायकवाड यांच्या घरकुलच्या खात्यातूनही सरपंचांनी 15 हजार रुपये, तर सुक्राम मोरे यांच्या खात्यातून 45 हजार रुपयांची रक्कम काढून आदिवासी बांधवांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे दोषी असलेल्या सरपंचांवर आर्थिक फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच ग्रामपंचायत विभागाने सर्व घरकुल लाभर्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी उपसरपंच मधुकर सोनवणे, माजी उपसरपंच गुलाब अहिरे यांनी केली आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sarpanch head of village cheated the villagers at nampur Nashik