सरसंघचालक मोहन भागवत यांची इंदिरानगर शाखेला भेट  

राजेंद्र बच्छाव
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

इंदिरानगर (नाशिक) - आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदिरानगर येथील मोदकेश्‍वर मंदीर प्रांगणात भरणाऱ्या मोदकेश्‍वर प्रभात शाखेत हजेरी लावली. येथे उपस्थित असलेल्या सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी दाखवलेल्या शिस्तीने पोलीस देखील आचंबीत झाले होते. तीस वर्षांपूर्वी प्रभाकर पाठक यांनी ही शाखा सुरू केली आहे. 

मंदीराच्या सभागृहात शाखेला नियमीत येणारे स्वयंसेवक मुख्य शिक्षक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभे करण्यात आले होते. याच ठीकाणी संघाचा पारंपारीक ध्वज देखील लावण्यात आला होता. इतर स्वयंसेवक सभागृहा बाहेर महिला आणि पुरूष अशा स्वतंत्र रांगेत उभे होते. बरोबर ८ वाजता भागवत यांचे येथे आमगन झाले. ते थेट सभागृहात गेले.ध्वजाला पारंपारीक प्रणाम केला.नमस्ते सदा वत्सले ही प्रार्थना झाली. कसे काय चालले?ठीक आहे ना?असे त्यांनी स्वयंसेवकांना विचारले. आतमध्ये हे सुरू असतांना सर्वत्र कमालीची शांतता होती. इतक्यात पहील्या रांगेत असलेल्या मनोहर वैद्य यांच्याकडे बघून त्यांनी विचारले आपले वय काय? ते म्हणाले ८३. यावर भागवत यांनी म्हणजे अजून शंभर व्हायला वेळ आहे असे सांगत त्यांना शुभेच्छा दील्या आणि निघाले. सभागृहाबाहेर ट्रस्ट तर्फे स्थानिक नगरसेवक चंद्रकांत खोडे, उत्तमराव निरगुडे, दीलीप गुंजाळ आदींनी भागवत यांना शाल आणि गुलाबपुष्प देवून त्यांचे आभार माणन्यात आले. ना कोणत्या घोषणा, ना फोटो वा सेल्फी काढण्यासाठी झुंबड, ना पोलीसांच्या शिट्या कींवा ना गाड्यांचे मागे धावणे सर्वत्र कमालीची शांतता त्यामुळे पोलीस देखील आचंबीत झाले होते.१० मिनटात सर्व आटोपत सरसंघचालकांचा ताफा नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे मार्गस्थ झाला.

यावेळी नगरसेवक सतिष कुलकर्णी, डॉ.दिपाली कुलकर्णी, शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, सहकार्यवाह मंगेश खाडीलकर, डॉ.अविनाश भावसार, दिलीप क्षिरसागर, सुनील नांदेडकर, धनंजय पाटील, सचिन कुलकर्णी आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.

Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwat visits the Indiranagar branch