सटाणा बाजार समिती, प्रस्थापितांना धोबीपछाड देत नवोदितांची मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

सटाणा : विभाजनानंतर शासनाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रथमच होत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नवोदितांनी मुसंडी मारत प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिला आहे. सुरुवातीस जुन्या जाणत्या उमेदवारांचा वरचष्मा असलेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल अनपेक्षित लागला. शेतकरी मतदार संघातील एकदोघे गण वगळता सर्वच गणांमध्ये शेवटपर्यंत अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी रौंदळ, शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.

सटाणा : विभाजनानंतर शासनाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रथमच होत असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नवोदितांनी मुसंडी मारत प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिला आहे. सुरुवातीस जुन्या जाणत्या उमेदवारांचा वरचष्मा असलेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याने निकाल अनपेक्षित लागला. शेतकरी मतदार संघातील एकदोघे गण वगळता सर्वच गणांमध्ये शेवटपर्यंत अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी रौंदळ, शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. अनिल पाटील तसेच समितीचे माजी संचालक विजयसिंग पवार यांनी सर्व शक्ती पणाला लावूनही त्यांना पराभवाचे धनी व्हावे लागले.  

काल (ता. 31) सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन प्रशासकीय सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. व्यापारी व हमाल – मापारी गटासाठी एक तर शेतकरी मतदार संघाच्या मतमोजणीसाठी दहा टेबल्सवर व्यवस्था करण्यात आलेली होती. व्यापारी गटापासून मतमोजणीस सुरुवात झाली. व्यापारी गटात जयप्रकाश सोनवणे (९५ मते) व श्रीधर कोठावदे (७० मते) हे विजयी झाले. किशोर गहिवड व अशोक बडजाते यांना पराभव पत्करावा लागला. हमाल – मापारी गटात संदीप दगा साळे (५१ मते) हे विजयी झाले. या गटात भगवान भारती, राहुल देसले, रमेश सोनवणे व रमेश मोरे हे पराभूत झाले. अजमेर सौंदाणे गणात प्रकाश देवरे हे अवघ्या ३४ मतांनी निवडून आले. त्यांना १२९५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाजार समितीचे माजी संचालक विजयसिंग पवार यांना १२६१ मते मिळाली. आराई गणात वेणूबाई माळी (६३६ मते) या निवडून आल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार समाधान अहिरे यांना अवघ्या २५१ मतांवर समाधान मानावे लागले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सटाणा गणात मंगला प्रवीण सोनवणे यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत विघ्ने, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. प्रत्येक गणांतील निकालाची घोषणा होताच विजयी उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते. आनंदोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात शहरातील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या. प्रत्येक विजयी उमेदवाराने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर विजयी उमेदवारांच्या गणांमध्ये सायंकाळपर्यंत विजयी जल्लोष सुरु होता

सटाणा बाजार समितीतील गणनिहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे :
अजमेर सौंदाणे - प्रकाश देवरे (१२९५)
आराई - वेणूबाई माळी (६३६)
सटाणा - मंगला सोनवणे (५८१)
मुंजवाड - प्रभाकर रौंदळ (८८३)
खमताणे - रत्नमाला सूर्यवंशी (९१०)
कंधाणे - संजय बिरारी (९०७)
डांगसौंदाणे - संजय सोनवणे (१०६२)
तळवाडे दिगर - पंकज ठाकरे (१५७६)
चौगाव - केशव मांडवडे (७८५)
वायगाव - मधुकर देवरे (११६०)
व्यापारी गट - जयप्रकाश सोनवणे (९५) व श्रीधर कोठावदे (७०)
हमाल मापारी गट - संदीप साळे (५१)

Web Title: satana agriculture market committee elections