सटाणा - देवमामलेदार देवस्थानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी २५ हजार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सटाणा - येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे काल बुधवार (ता.२९) रोजी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'सकाळ' रिलीफ फंडाला २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. सकाळ माध्यम समूहातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत देवस्थानने काल ही मदत दिली.

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी 'सकाळ' चे बातमीदार अंबादास देवरे यांच्याकडे २५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, राजेंद्र भांगडिया, रमेश सोनवणे, प्रवीण पाठक, एड. विजयबापू पाटील, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, कौतिक सोनवणे, सुनील मोरे, देवमामलेदार रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बा. जि. पगार, अभिजित बागड, देविदास भावसार आदींसह भाविक उपस्थित होते.

Web Title: Satana - Devamamlodar Devasthan, 25 thousand for Kerala flood victims