शेतकऱ्यांच्या कर्ज वसूली विरोधात स्थगन प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सटाणा - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी कर्जदार शेतकऱ्यांशी उर्मटपणे वागत असल्यामुळे पांढुर्ली (ता.सिन्नर) येथील महिला शेतकरी सुलोचना वाजे व त्यांचा मुलगा प्रकाश वाजे यांनी विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे लांच्छनास्पद असून, शासनाने विधानसभेत निवेदन करावे, या आशयाची स्थगन प्रस्तावाची सूचना बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल विधानसभेत मांडली.

या स्थगन प्रस्तावावर बोलताना आमदार चव्हाण म्हणाल्या, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली पथकातील अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील महिला शेतकरी सुलोचना वाजे यांच्याशी अरेरावी करीत वाद घालून कर्जवसुलीचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांकडून बळजबरीने ट्रक्टर ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करणे असा प्रयत्न जिल्हाभर होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची गरज असताना नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा लाभ झालेला नाही. माझ्या बागलाण, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरसह इतर मालमत्तांचे लिलाव करणे. त्यातून कर्जवसुली करणे हा प्रकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. अधिकाऱ्यांच्या उर्मट व उद्धटपणामुळे वाजे माता - पुत्राने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नाशिकरोड येथील संतकृपा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासनविरोधी भावना पसरत असून, शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने आजच याबाबत विधानसभेत निवेदन करावे अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे आमदार सौ.चव्हाण यांनी केली.

Web Title: satana farmers loan Debt recovery deepika chavhan