सटाणा- चौंधाणे गावास संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौंधाणे व मुंगसे या दोन्ही गावांनी राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७ - १८ अंतर्गत तालुक्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. चौंधाणेस एक लाख तर मुंगसेस ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौंधाणे व मुंगसे या दोन्ही गावांनी राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७ - १८ अंतर्गत तालुक्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. चौंधाणेस एक लाख तर मुंगसेस ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे.

या पुरस्कारांतर्गत जिल्हासमितीने बुधवार (ता.२१) रोजी पहाणी करून हा निकाल दिला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ अंतर्गत नाशिक जिल्हास्तरीय तपासणी समितीने ग्रामीण पाणीपुरवठा नाशिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने चौंधाणे गावास भेट दिली. दिंडोरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी भगवान गर्जे, स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक संदीप जाधव, पाणी व स्वच्छता अभियंता सागर रोडे, बागलाण पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी नितीन देशमुख, वैभव पाटील यांचा या समितीमध्ये समावेश होता. या अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातून ३० गावांची पाहणी करण्यात येणार आहे. यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाणार असून तालुकास्तरावर चौंधाणे गावास प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे.

समितीने गावातील शौचालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन, प्रत्येक घर व गाव परिसर स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज संकल्पनेनुसार उपलब्धी, लोकसहभागातून आणि सामुहिक पुढाकारातून नाविन्यपूर्ण उपलब्धी, शैक्षणिक सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, गावांतर्गत रस्ते, गटारी, आरोग्याच्या सुखसुविधा, गावातील वृक्षसंवर्धन, तीर्थक्षेत्र, वाचनालय, ओपन जिम, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आदींची समितीने पाहणी करून अहवाल सादर केला.

विद्यार्थी, ग्रामस्थ व भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगवाणीने या जिल्हा समितीचे स्वागत केले. ग्रामपंचायत कार्यालयात गावातर्फे समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व आदिवासी नृत्य सादर केले. माजी सरपंच राकेश मोरे यांनी प्रास्ताविकात गावातील विकासकामांसंदर्भात माहिती देत गतकाळातील सुधारणांबाबत माहिती दिली.

यावेळी सरपंच लीलाबाई मोरे, उपसरपंच रवींद्र मोरे, राकेश मोरे, ग्रामविकास अधिकारी एन. सी. वाघ, संजय खैरनार, किरण मोरे, विमल मोरे, अनिता बागुल, शोभा बागुल, माया बर्डे, वासिम बेग, अंबादास पवार, कमल गायकवाड, कडू मोरे, दामू मोरे, जिभाऊ मोरे, मोठाभाऊ बागुल, , हरी बागुल, राजाराम पवार, नामदेव बर्डे, रामा गोरे, बाळू मोरे, केदा मोरे, दगडू बेग, जनार्दन मोरे, प्रभाकर पवार, गंगाराम पानपाटील, दीपक बोरसे, अशोक मोरे, एस. एन. खैरनार, जे. पी.वाघ, रमेश मोरे, बाळासाहेब पवार, डॉ. हेमंत पवार, अंगणवाडी सेविका, महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: satana news choundhane village first prize for gram swachata abhiyan